वीज वितरण कार्यालयासमोर वीजबिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:12 IST2020-11-24T00:15:44+5:302020-11-24T02:12:02+5:30
पेठ : भारतीय जनता पक्षाच्या पेठ शहर व तालुका शाखेच्या वतीने शहरातील वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वाढीव वीजबिलांची होळी करत महाविकास आघाडीचा निषेध केला.

पेठ येथील महावितरण कंपनी कार्यालयासमोर वीजबिलांची होळी करताना संजय वाघ, रघुनाथ चौधरी, विजय देशमुख आदी.
ठळक मुद्देमहाविकास आघाडीचा निषेध केला.
पेठ : भारतीय जनता पक्षाच्या पेठ शहर व तालुका शाखेच्या वतीने शहरातील वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वाढीव वीजबिलांची होळी करत महाविकास आघाडीचा निषेध केला. ऐन कोरोनाकाळात हाताला काम नाही, शेतात उत्पन्न नाही अशा परिस्थितीत शेतकरी व सामान्य जनतेला वाढीव वीजबिलांचा शॉक देऊन महाविकास आघाडी सरकारने आर्थिक संकट उभे केले. या धोरणाच्या निषेधार्थ तालुकाध्यक्ष संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली वीजबिलांची होळी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष रघुनाथ चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष विजय देशमुख आदींसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.