शिवसैनिकांकडून पाकध्वजाची होळी

By Admin | Updated: July 11, 2017 18:39 IST2017-07-11T18:39:07+5:302017-07-11T18:39:07+5:30

अमरनाथ यात्रेवर पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करून सात शिवभक्तांना ठार केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय विद्यार्थी सेनेने शालिमार चौकात पाकिस्तानविरोधी जोरदार घोषणाबाजी

Holi celebrations for Shiv Sainiks | शिवसैनिकांकडून पाकध्वजाची होळी

शिवसैनिकांकडून पाकध्वजाची होळी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अमरनाथ यात्रेवर पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करून सात शिवभक्तांना ठार केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय विद्यार्थी सेनेने शालिमार चौकात पाकिस्तानविरोधी जोरदार घोषणाबाजी करीत पाकचा ध्वज जाळला.
सोमवारी रात्री काश्मीरमध्ये हा प्रकार घडला. त्याचे तीव्र पडसाद उमटले असून, सर्वत्र या भ्याड कृत्याचा निषेध नोंदविला जात असताना दुपारी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाबाहेर पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात भगवे ध्वज घेतलेल्या शिवसैनिकांनी यावेळी पाकिस्तानच्या ध्वजाला ‘जोडेमार’ करून नंतर पेटवून दिले. या आंदोलनात विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख योगेश बेलदार, उपमहानगर प्रमुख राजेंद्र क्षीरसागर, विभाग प्रमुख अमोल सूर्यवंशी, देवा जाधव, मंगेश पवार, स्वप्नील पासले, मयूर जुन्नरे, मयूर पगार, स्वप्नील घोडके, स्वप्नील जाधव, धनंजय जाधव आदी सहभागी झाले होते.

Web Title: Holi celebrations for Shiv Sainiks