येवल्यात शिवसेनेकडून नायलॉन मांजाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:50 IST2019-01-03T00:50:24+5:302019-01-03T00:50:58+5:30

येवला : मकर संक्रांत उत्सवाच्या काळात येवला शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. त्यात घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होऊ नये आणि या मांजावर बंदी घालण्यासाठी येवल्यात शिवसेना व नागरिकांच्या वतीने सराफ बाजारात नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.

Holi celebrations of Nylon Manza by Shiv Sena | येवल्यात शिवसेनेकडून नायलॉन मांजाची होळी

येवला येथे शिवसेनेच्या वतीने नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देआंदोलन : बंदी घालण्याची मागणी

येवला : मकर संक्रांत उत्सवाच्या काळात येवला शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. त्यात घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होऊ नये आणि या मांजावर बंदी घालण्यासाठी येवल्यात शिवसेना व नागरिकांच्या वतीने सराफ बाजारात नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.
तीन दिवस चालणाऱ्या या ॅसंक्रांत उत्सवादरम्यान पतंग उडविणासाठी अधिक उत्तम दर्जाचा दोरा वापरण्यासाठी चढाओढ सुरू असते. संक्रात उत्सव हा येवल्यात शेकडो वर्षांपासून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पूर्वी पतंग उडविण्यासाठी लागणारा दोरा म्हणजेच मांजा हा मजबूत दोरा, चरस, काचेची भुकटी, रंग आदीचा वापर करून तयार केला जायचा. हा दोरा पतंग उडविण्यासाठी सर्वोत्तम मानला जायचा; परंतु गेल्या काही वर्षांपासून बाजारात नायलॉन मांजा विक्रीसाठी येऊ लागला आहे. कोणतेही कष्ट न करता तयार दोरा उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून त्याचा वापर होऊ लागला आहे. या घातक व न तुटणाºया या दोºयामुळे अनेक अपघात घडून पशुपक्ष्यांनादेखील आपला जीव गमवावा लागत आहे. अशा घातक मांजाची विक्री व वापर बंद करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मांजा विक्र ी करणारे व वापरणारे अशा दोघांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत शिवसेनेच्या वतीने येथील सराफ बाजारात नायलॉन मांजाची होळी करण्यात आली....अन्यथा आमरण उपोषणनायलॉन मांजाच्या विक्र ी व वापरावर बंदी न घातल्यास
१४ जानेवारीपासून शहर पोलीस ठाण्यासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना येवला तालुका समन्वयक धीरजसिंग परदेशी, शेरू मोमीन, अमित अनकाईकर, अलताफ शेख, नितीन जाधव, आदम मोमीन, मोबीन खान, शाकीर खान, रूपेश घोडके, इब्राहीम सय्यद, सोमनाथ काथवटे, आशिष अनकाईकर, दीपक काथवटे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Holi celebrations of Nylon Manza by Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस