प्राथमिक शिक्षक समितीची तहसील कार्यालयासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 22:36 IST2021-11-03T22:36:10+5:302021-11-03T22:36:39+5:30
सिन्नर : शिक्षकांच्या व विद्यार्थी हिताच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्यभर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

सिन्नर येथे नायब तहसीलदारांना शिक्षकांच्या प्रश्नांबाबतचे निवेदन देताना प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी.
सिन्नर : शिक्षकांच्या व विद्यार्थी हिताच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्यभर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
त्याच अनुषंगाने विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सिन्नर येथे प्रांताधिकारी, तहसीलदार यांना समितीतर्फे आंदोलन करत निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे राज्य संघटक नंदू आव्हाड, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा उपाध्यक्ष श्रावण वाघ, जिल्हा प्रतिनिधी संदीप काकड, तालुका मार्गदर्शक वाल्मिक शिंदे, शालिवान कदम, संजय चतुर, तालुकाध्यक्ष अशोक कासार, सरचिटणीस सुकदेव वाघ, कार्याध्यक्ष शिवाजी जाधव, दत्तात्रय शिरतार, पोपट कथले, जीवन पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.