‘शासन की हिटलरशाही चल रही हैं!’
By Admin | Updated: July 22, 2015 01:19 IST2015-07-22T01:15:31+5:302015-07-22T01:19:27+5:30
‘शासन की हिटलरशाही चल रही हैं!’

‘शासन की हिटलरशाही चल रही हैं!’
नाशिक : ‘साधू लोगों को सुविधा नही मिली, तो कुंभमेले का मतलब ही क्या रहा? सब शासन-प्रशासन की हिटलरशाही चल रही है ’, असे म्हणत उपोषणकर्त्या गणेशदास यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात शासनाकडून विविध सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी सोमवारपासून हनुमंत खालशाचे गणेशदास महाराज यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून, अद्याप कोणताही अधिकारी इकडे फिरकला नसल्याचे त्यांनी सांगितले.
या मागण्यांची पूर्तता होत नसल्याचा आरोप करून येत्या बुधवारपर्यंत (दि.२२) याबाबत प्रशासनाकडून योग्य कार्यवाही
न झाल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन करण्याचा पवित्रा गणेशदास यांनी घेतला आहे.