शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

‘त्याच्या’ निर्दयी कत्तलीने सारेच हळहळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:51 IST

तो एक आम्रवृक्ष... वृक्ष नव्हे कल्पतरूच... सावली अन् फळे देणारा, त्याचबरोबर आजूबाजूच्या बऱ्या-वाईट समस्त घटनांचा साक्षीदार... जो जुना असला तरी कुटुंबप्रमुखाप्रमाणेच साºयांना सांभाळत रस्त्याच्या कडेला उभा... पण कोणाला त्याचे अस्तित्व खटकले कोणास ठाऊक... एक दिवस कोणीतरी बेमालूमपणे त्याची कत्तल केली आणि दुसºया दिवशी सकाळी तो जागेवर नव्हताच... एवढ्या निर्दयीपणे कोणी आणि कशासाठी तरी असा घाला घालावा... म्हणून सारेच अंचबित तर झालेच.

ठळक मुद्देआम्रवृक्षाची अखेर : आज होणार श्रद्धांजली सभा

नाशिक : तो एक आम्रवृक्ष... वृक्ष नव्हे कल्पतरूच... सावली अन् फळे देणारा, त्याचबरोबर आजूबाजूच्या बऱ्या-वाईट समस्त घटनांचा साक्षीदार... जो जुना असला तरी कुटुंबप्रमुखाप्रमाणेच साºयांना सांभाळत रस्त्याच्या कडेला उभा... पण कोणाला त्याचे अस्तित्व खटकले कोणास ठाऊक... एक दिवस कोणीतरी बेमालूमपणे त्याची कत्तल केली आणि दुसºया दिवशी सकाळी तो जागेवर नव्हताच... एवढ्या निर्दयीपणे कोणी आणि कशासाठी तरी असा घाला घालावा... म्हणून सारेच अंचबित तर झालेच, परंतु होली क्रॉसच्या फादर वेन्सी यांनी त्यांना जाणवणाºया वेदना मांडल्यानंतर आता समविचारी मंडळी एकत्र आली असून, रविवारी (दि.१६) याच ठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.जित्या जागत्या माणसाच्या निधनानंतर त्याला श्रद्धांजली अर्पण केली जाते खरी; परंतु नाशिकमध्ये मात्र वृक्षतोडीमुळे हळव्या झालेल्यांनी शोकसभेचा अपवादात्मक प्रकार रविवारी (दि.१६) होणार आहे. होली क्रॉसच्या चर्चजवळील हा वृक्ष केवळ फळे आणि सावली देणाराच नव्हता तर परिसरात तीन पेट्रोलपंप असताना प्राणवायू देण्यासाठी त्याची भूमिका अधिक महत्त्वाची होती. कोणला अडथळा नसलेले हे झाड कोणाला अडथळा ठरले कोणास ठाऊक परंतु ते तोडण्यात तर आलेच, परंतु महापालिकेच्या परवानगीनेच ही कत्तल करून वृक्षाचे ‘देहदान’ नगरसेविकेकडे करण्यात आल्याचे फादर वेन्सी यांनी सांगितले. महापालिका अशाप्रकारे वृक्षाच्या कत्तलीसाठी परवानगी देईल यावर त्यांचाही विश्वास बसत नाहीये. परंतु राष्टÑ सेवा दलाचा सच्चा सैनिक असलेल्या फादर वेन्सी यांनी व्हॉट्स अ‍ॅप पोस्टवरून ही एक पोस्ट समविचारी राष्टÑ सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना पाठविली. त्यांनाही या भावना रूचल्या आणि आता अशाप्रकारे वृक्षतोड अकारण होऊ नये यासाठी सारेच एकत्रित होऊ लागले. या समविचारी कार्यकर्त्यांनीच शहरात अशाप्रकारे अकारण होणाºया वृक्षतोडीस विरोध करण्याचे ठरवले आणि त्यासाठीच निमित्त ठरवले ते श्रद्धांजली सभेचे. रविवारी (दि.१६) सायंकाळी ही शोकसभा होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentवातावरण