हिरावाडीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

By Admin | Updated: October 25, 2015 23:57 IST2015-10-25T23:57:40+5:302015-10-25T23:57:59+5:30

हिरावाडीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

Hirawadi gang-raid gang raid | हिरावाडीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

हिरावाडीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

नाशिक : हिरावाडीतील कमलनगर परिसरात दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या दहा जणांच्या टोळीला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून धारदार शस्त्रास्त्रे तसेच दोन चारचाकी वाहने जप्त केली आहे. या संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुन्हा शोध पथकाचे कर्मचारी रविवारी पहाटेच्या सुमाराला हिरावाडी परिसरात गस्त घालत असताना कमलनगर म्हशीच्या गोठ्यानजीक दोन स्विफ्ट वाहने जाताना दिसली पोलिसांनी ती वाहने थांबवून चौकशी करून वाहनाची झडती घेतली असता संशयितांकडे चाकू, कोयता,चॉपर, दांडा अशा वस्तू मिळून आल्या. सदरचे संशयित हे कुठेतरी दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. राकेश कोष्टी, जयेश दिवे, अक्षय इंगळे, कुंदन परदेशी, मयूर कानडे, परीक्षित सूर्यवंशी, राकेश शेवाळे, लखन जाधव, गणेश कालेकर, सुनील धोत्रे, असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून दोन स्विफ्ट जप्त करण्यात आल्या असून, ताब्यात घेतलेले संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Hirawadi gang-raid gang raid