लसीकरण रद्द झाल्याने हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 11:53 PM2021-05-08T23:53:18+5:302021-05-09T00:18:57+5:30

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि.८) १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोव्हॅक्सिनचे लसीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या लसीकरणासाठी शासनाने दिलेल्या वेबसाइटवर अनेकांनी रजिस्टर नोंदणी केली. त्यात नाशिक शहरातून अनेकांनी नाव रजिस्टर केले. तेव्हा त्यांना १०० किमीवरून ब्राह्मण गाव हे सेंटर देण्यात आल्याने शनिवारी सकाळी नाशिक, कळवणहून अनेक लाभार्थी लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. मात्र, सदर लसीकरण कार्यक्रम रात्री उशिरा तांत्रिक कारण दाखवून रद्द करण्यात आला. परिणामी, १००/ ५० किलोमीटरहून खासगी वाहनाने आलेल्या या नागरिकांना हिरमोड होऊन लसी न घेताच, माघारी परत जावे लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Hiramod due to cancellation of vaccination | लसीकरण रद्द झाल्याने हिरमोड

लसीकरण रद्द झाल्याने हिरमोड

Next
ठळक मुद्देब्राह्मणगाव : लसीसाठी १०० किमी प्रवास

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि.८) १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोव्हॅक्सिनचे लसीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या लसीकरणासाठी शासनाने दिलेल्या वेबसाइटवर अनेकांनी रजिस्टर नोंदणी केली. त्यात नाशिक शहरातून अनेकांनी नाव रजिस्टर केले. तेव्हा त्यांना १०० किमीवरून ब्राह्मण गाव हे सेंटर देण्यात आल्याने शनिवारी सकाळी नाशिक, कळवणहून अनेक लाभार्थी लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. मात्र, सदर लसीकरण कार्यक्रम रात्री उशिरा तांत्रिक कारण दाखवून रद्द करण्यात आला. परिणामी, १००/ ५० किलोमीटरहून खासगी वाहनाने आलेल्या या नागरिकांना हिरमोड होऊन लसी न घेताच, माघारी परत जावे लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना लसीकरण कार्यक्रम प्रथमच जाहीर करण्यात आला. सदर लसीकरण कार्यक्रम हा जिल्हा परिषद गट, तालुका, जिल्हा असा कोणासाठी आहे, हे मात्र जाहीर करण्यात आले नाही. त्यातच पुन्हा सर्वत्र लसीकरणाच्या जागृतीमुळे ज्येष्ठांबरोबर तरुण वर्ग ही लस घेण्यासाठी शासकीय वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करत आहेत व लस घेण्यासाठी उत्सुक आहेत. हे रजिस्टर नोंदणी करताना जवळचे लसीकरण केंद्र रजिस्टर दाखवले गेले पाहिजे. मात्र, अनेकांचे नाव नोदणी करतांना नाशिकहून १०० किलोमीटर दूर अंतर असलेल्या केंद्र रजिस्टर झाल्याने नागरिक नाशिकहून ब्राह्मणगावला सकाळी ८ वाजेपासून उपस्थित राहिले. मात्र, ब्राह्मणगावचे शनिवारी होणारे लसीकरण कार्यक्रम तांत्रिक कारण दाखवून रद्द करण्यात आल्यामुळे सावळा गोंधळ झाल्याचे चित्र दिसून आले. वार्ड, शहर, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र नुसार लसीकरण नाव नोंदणी होणे गरजेचे आहे, जेणेकरून नागरिकांना कोठेही नाहक हेलपाटे मारायला लागणार नाही. याबाबत संबंधित आरोग्य खात्याने याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लसीकरणसाठी शासनाने दिलेल्या वेबसाइटवर रजिस्टर नोंदणी करताना, ब्राह्मणगाव हे सेंटर दिल्याने आम्ही एवढ्या दूरवर आलो. मात्र, येथे लसीकरण कार्यक्रम रद्द झाल्याने आम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
- संजय कोपरगावकर, नाशिक.

लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहीम रद्द करावी लागली. नागरिकांनी लसीसाठी नाव नोंदणी करताना जवळचे लसीकरण केंद्र निवड करावे.
- डॉ.राहुल कांबळे, वैद्यकीय अधिकारी, ब्राह्मणगाव.

(०८ ब्राह्मणगाव)
लसीअभावी बंद असलेले ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र.

Web Title: Hiramod due to cancellation of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.