येवल्यात हिंगलाज माता तेरसू उत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:16 IST2021-08-23T04:16:25+5:302021-08-23T04:16:25+5:30

कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजकार्य करणाऱ्या समाज बांधवांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर यंदाचा भावसार भूषण ...

Hinglaj Mata Tersu festival celebrated in Yeola | येवल्यात हिंगलाज माता तेरसू उत्सव साजरा

येवल्यात हिंगलाज माता तेरसू उत्सव साजरा

कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजकार्य करणाऱ्या समाज बांधवांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर यंदाचा भावसार भूषण पुरस्कार प्रतिभा ज्ञानेश्वर चव्हाण यांना देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाकांत रामकृष्ण बुद्धिवंत होते. यावेळी डॉ. योगेश भारोटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष कुणाल भावसार, डॉ. चंद्रशेखर भावसार, किशोर भावसार, दिलीप चव्हाण, सुरेश भावसार, प्रियांका शिंत्रे, शीतल भावसार, मीना बुद्धिवंत, प्रवीण भावसार, हेमंत चव्हाण, भूषण भावसार, प्रतिभा चव्हाण, अच्युत शिंत्रे आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला. समाजाच्या नूतन कार्यकारिणीचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास समाजाचे अध्यक्ष किशोर भावसार, उपाध्यक्ष सुनील सरोदे, सचिव ज्ञानेश्वर चव्हाण, खजिनदार सोमनाथ बुद्धिवंत, अमोल भारोटे, अतुल चव्हाण, राजेंद्र बुद्धिवंत, चेतन भावसार, कुणाल भावसार, संदीप बनसोड, प्रवीण शिंत्रे, नरेंद्र चव्हाण, भूषण भावसार, सरोजनी चव्हाण, अशोक तुंगे, किशोर भावसार, प्रतिभा चव्हाण आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Hinglaj Mata Tersu festival celebrated in Yeola