उपनगर सिग्नल भागात महामार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 03:32 PM2019-09-21T15:32:28+5:302019-09-21T15:36:00+5:30

नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गावर खड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच याठिकाणी रस्त्यांवरच पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या खड्डे, डबक्यांमधूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना याठिकाणाहून प्रवास करतांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.

Highway conditions in upnagar signal areas | उपनगर सिग्नल भागात महामार्गाची दुरवस्था

उपनगर सिग्नल भागात महामार्गाची दुरवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देखड्डे, पाण्याच्या डबक्यांमधुन काढावा लागतोय मार्गआपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाशिक : शहरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून यामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गावर खड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच याठिकाणी रस्त्यांवरच पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या खड्डे, डबक्यांमधूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना याठिकाणाहून प्रवास करतांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
पावसामुळे दरवर्षीच शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था होत असते. त्यामुळे दिवसांगणिक खड्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निर्दर्शनास येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शहरांची दुरुस्ती ही दरवर्षी करण्यात येते मात्र पुन्हा या मार्गांची दुरवस्था होऊन मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार होत असतात त्यामुळे प्रशासनाक डून नेमक्या कशाप्रकारे दुरुस्ती करण्यात येते याबाबत नागरिकांनाकडुन प्रश्न उपस्थित होत आहे. असा कुठलाच मार्ग नाही ज्याठिकाणी खड्डे बघायला मिळत नाही. त्यात नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गाची अवस्था बिकट होत चालली आहे. याठिकाणी खड्यांचे प्रमाण दरवेळीपेक्षा अजुन वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी खड्यांसह पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही पाण्यातुनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

संपुर्ण महामार्गावरच खड्डे
नाशिकरोड ते द्वारकापर्यंत संपुर्ण महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. सावरकर उड्डानपुलाच्या सुरुवातीपासुनच खड्डे बघायला मिळतात. तसेच पुढे बिटको महाविद्यालय, बिग बाजार, मुद्रणालय कॉलनी, अशोका सिग्नल, भाभा नगर सिग्नल या भागात महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहे. त्यात या खड्यांमध्ये पावसाचे पाण्याचे डबके साचल्यामुळे प्रवाशांना व पादचाºयांनांही यातूनच मार्ग काढावा लागत आहे. अशात याठिकाणी किरकोळ अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे.


दररोज शहरात येतांना मार्गावर एक नवीन खड्डा तयार झालेला दिसतो, मात्र कमी होतांना दिसत नाही. त्यात नव्याने तयार झालेल्या खड्यांना चुकविण्यात काही जणांचा अपघात देखील झाला. त्यामुळे प्रशासन कोणाचा जीव जाण्याची वाट बघत आहे का? त्यात या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतुक होत असते. अशात या मार्गाची कायमस्वरुपी दुरुस्थी होणे गरजेचे आहे.
तुषार गाडे, प्रवासी
 

 

Web Title: Highway conditions in upnagar signal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.