नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला असून बुधवारी (दि. १७) दिवसभरात तब्बल २१४६ इतके बाधित रुग्ण आढळले आहे. ही आजवरची एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.जिल्ह्यात बुधवारी (दि.१७) तब्बल २१४६ बाधित रुग्ण तर ६९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ३, मालेगावला १, ग्रामीणला ४ तर जिल्हा बाह्य १ असे एकूण ९ जणांचे बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २१९३ वर पोहोचली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कोरोनाबाधितांची दररोजची संख्या साधारणपणे दीडशेच्या आसपास आली होती. मात्र, दरम्यानच्या काळातील लग्नसोहळे आणि उत्सवी वातावरणासह जनतेत कोरोनाबाबत आलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले. गत आठवडाभरापासून तर कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने हजार ते पंधराशेवर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. त्यात बुधवारी कोरोनाबाधितांचा आजपर्यंतचा सर्वाधिक म्हणजे २१४६ इतका बाधित आकडा आल्याने तर नागरिकांसह सर्वत्र पुन्हा एकदा कोरोनाची भीती जाणवू लागली आहे.इन्फोसप्टेंबरनंतर आताचगतवर्षी सर्वाधिक कोरोना रुग्ण १६ सप्टेंबरला सापडले होते. त्यावेळी ही बाधित संख्या तब्बल २०४८ इतकी होती. तेव्हा प्रथमच आणि एकदाच कोरोनाने दोन हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर थेट मार्च महिन्यातच कोरोनाने त्यापेक्षाही ९८ अधिक म्हणजे २१४६ इतके बाधित रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे.इन्फोआठवडाभरात १० हजारावर बाधितजिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत हजारावर भर पडण्यास ११ तारखेपासून प्रारंभ झाला. ११ मार्चला ११४०, १२ मार्चला ११३८ , १३ मार्चला १५२२, १४ मार्चला १३५६, १५ मार्चला १३७६, १६ मार्चला १३५४ तर १७ मार्चला तब्बल २१४६ असा सलग आठवडाभर कोरोनाबाधितांच्या संख्येने कळस गाठला आहे. आठवडाभरातील बाधितांची संख्या तब्बल १०,०३२ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 00:00 IST
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला असून बुधवारी (दि. १७) दिवसभरात तब्बल २१४६ इतके बाधित रुग्ण आढळले आहे. ही आजवरची एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचा उच्चांक
ठळक मुद्देएकाच दिवसात दोन हजाराहून अधिक बाधित