शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आज कोरोना रूग्णांचा उच्चांक ; दिवसभरात आढळले ११६ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 22:39 IST

लॉकडाऊन शिथिल होताच महापालिका हद्दीतील विविध उपनगरीय भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढू लागले.

ठळक मुद्देआकडा थेट शंभरीपार म्हणजेच ११६ इतका झालासर्वच वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण कोरोनाचे वाढते थैमान हा प्रशासनाचा मोठा चिंतेचा विषय

नाशिक : शहर व परिसरात कोरोना विषाणूचा फैलाव अत्यंत वेगाने होऊ लागला आहे. यामुळे नाशिककरांनी अधिक सतर्क होऊन स्वत:ला गर्दीपासून सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. गुरूवारी (दि.१८) रात्री दहा वाजेपर्यंत जिल्हा रूग्णालय व महापालिका आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालांनुसार शहरात नवे ११६ कोरोेनाबाधित आढळून आले. तसेच उपचारार्थ दाखल दोन कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यूही झाला.लॉकडाऊन शिथिल होताच महापालिका हद्दीतील विविध उपनगरीय भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढू लागले. दिवसभरात आतापर्यंत ६५ रूग्ण आढळून येण्याचा उच्चांक होता; मात्र गुरूवारी कोरोनाबाधितांचा आकडा थेट शंभरीपार म्हणजेच ११६ इतका झाला. यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनालादेखील धक्का बसला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असुनही या आजाराचे संक्रमण थांबता थांबत नसल्याने आश्चर्य अन् चिंताही व्यक्त होत आहे. नाशिक महापालिका हद्दीचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता लवकरच एक हजारीवर पोहचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरूवारी रात्रीपर्यंत शहराचा अतापर्र्यंतचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९७७ इतका झाला तर एकूण ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४०४ रूग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. सध्या ५२५ रूग्ण उपचारार्थ रुग्णालयांमध्ये दाखल आहेत.शहरातील दाट लोकवस्तीच्या परिसरात कोरोनाचे वाढते थैमान हा मनपा आरोग्य प्रशासनाचा मोठा चिंतेचा विषय बनत चालला आहे. दाट लोकवस्तीच्या परिसरात कोरोनाचे संक्रमण रोखायचे कसे? हा यक्ष प्रश्न झाला आहे. सातत्याने पंचवटी, जुने नाशिक भागातील दाट लोकवस्तीत रूग्ण आढळून येत आहे. गुरूवारी मखमलाबाद-१, पेठफाटा-१, पेठरोडवरील रामनगरमध्ये ११ तर पेठरोडवरील अन्य भागात १५ आणि याच परिसरातील ओमनगरमध्ये-४ दत्तनगरमध्ये१४ फुलेनगर-२ वैशालीनगर-१ भराडवाडी-३ , म्हसरूळचे कलानगर- ३ मेरी कॉलनी-१, शांतीनगर-१, गजानन अपार्टमेंट, तवलीफाटा-१, वृंदावन कॉलनी-१, टिळकवाडी (आरटीओ)-१, म्हाडा कॉलनी-५ तर जुने नाशिकमधील कथडा-३, अमरधामरोड-१, खडकाळी-८, कोकणीपुरा-२, जुने नाशिक-३, चौकमंडई-१, शालिमार-१, गंजमाळ-२, पखालरोड-१, वडाळारोड-२, भारतनगर-१, इंदिरानगर-१, राजीवनगर-१, दिपालीनगर-१, बोधलेनगर-२, वैद्यनगर (पोर्णिमा स्टॉप)-१, गंगापूररोडवरील सावरकरनगर-१, राका कॉलनी-१, संभाजी चौक-१, उंटवाडी-१, औदुंबर स्टॉप (सिडको)-२, बाजीप्रभू चौक (सिडको)-१, उत्तमनगर-१, कामटवाडा-१, शिवाजीनगर (सातपूर)-१,उपनगर-१, पंजाब कॉलनी (ना.रोड)-१, पवारवाडी (ना.रोड)-१, विहितगाव-१, गोसावीवाडी-१, शिंगवेबहुला (दे.कॅम्प)-१ अशा सर्व भागात रूग्ण मिळून आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून शाळकरी मुलांपर्यंतचा समावेश आहे. एकूणच शहरातील सर्वच वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येते. यावरून असे दिसते की नाशिक शहराने कोरोना रूग्णांच्या बाबतीत मालेगावलादेखील मागे टाकले आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस