नाशिक : अयोध्येतील संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालय शनिवारी सकाळी निकाल देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्हाभरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील ठिकाणांसह चौकाचौकांत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.नाशिक शहर आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ४) झालेल्या बैठकीत सर्व पोलीस उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित शहरातील बंदोबस्ताच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात ४ पोलीस उपायुक्त, ८ सहायक आयुक्त, १५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुमारे दोन हजार पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले असून, शीघ्र कृतिदल, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल यांसह विविध आपत्कालीन पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे, तर पोलीस अधीक्षक कार्यालय आडगाव येथे डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीतील नियोजनाप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखेसह इतर सर्व शाखांचा प्रभारी जिल्हाभरात बंदोबस्त तैनात केला आहे.जिल्ह्यात दोन अपर पोलीस अधीक्षक, ८ पोलीस उपअधीक्षक, ३० पोलीस निरीक्षक, ८० सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, २५०० पोलीस कर्मचारी व ४०० होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यात आले असून, शीघ्र कृतिदल, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल यांसह विविध आपत्कालीन पथकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.सतर्क राहण्याच्या सूचनाप्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत जास्तीत जास्त मनुष्यबळ वापरून फिक्स पॉइंट, पायी गस्त, वाहनावरील पेट्रोलिंग अशा पद्धतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेत पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.सोशल मीडियावर अफवा पसरवू नकासर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणात निकाल दिल्यानंतर निकालाबाबत व्हॉट्सअॅप, फेसबुक अथवा सोशल मीडियावर कोणीही अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणी अफवा पसरवून सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास त्याच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:41 IST
अयोध्येतील संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालय शनिवारी सकाळी निकाल देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला असून, जिल्हाभरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील ठिकाणांसह चौकाचौकांत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट
ठळक मुद्देठिकठिकाणी नाकाबंदी : जिल्ह्यातही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात