उमराणे बाजार समितीत डाळिंबाला उच्चांकी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:03 IST2020-07-22T20:52:15+5:302020-07-23T01:03:26+5:30
उमराणे : येथील कै. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब खरेदी-विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी डाळिंबाच्या २० किलो क्रेटला सर्वाच्च ११५० रुपये दर मिळाला.

उमराणे बाजार समितीत डाळिंबाला उच्चांकी दर
उमराणे : येथील कै. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब खरेदी-विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी डाळिंबाच्या २० किलो क्रेटला सर्वाच्च ११५० रुपये दर मिळाला. उमराणेसह परिसरात कांदा, मका व डाळिंब आदी शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या अनुषंगाने येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार माल खरेदी-विक्र ी होत असल्याने कांदा व मका विक्रीसाठी शेतकऱ्यांना ही बाजार समिती उपयुक्त ठरत आहे.
परंतु डाळिंब विक्रीसाठी जवळपास मार्केट नसल्याने शेतकऱ्यांना डाळिंब विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे उमराणे बाजार समितीत डाळिंब व भाजीपाला लिलाव सुरू करण्यात यावेत, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने डाळिंब लिलाव सुरू करण्यात आले आहे. बाजार आवारात पहिल्याच दिवशी सुमारे १५० ते २०० क्रेट्स डाळींब विक्र ीसाठी दाखल झाले होते. येथील शेतकरी संजय रावण देवरे या शेतकºयांच्या डाळींब क्रेट्सला सर्वोच्च ११५० रुपये दर मिळाला. डाळिंब उत्पादक शेतकºयांनी प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नितीन जाधव व सहाय्यक सचिव तुषार गायकवाड यांनी केले आहे.