नाशिक दुर्घटनेची होणार उच्च्चस्तरीय चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 02:16 IST2021-04-22T02:16:37+5:302021-04-22T02:16:57+5:30
नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावा लागला. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचा आदेश त्यांनी दिला असून, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

नाशिक दुर्घटनेची होणार उच्च्चस्तरीय चौकशी
मुंबई : नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावा लागला. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचा आदेश त्यांनी दिला असून, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
एकाएका रुग्णास सावरण्यासाठी शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाइकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच. या दुर्घटनेस जबाबदार असेल, त्याची गय केली जाणार नाही; पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू? नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वर्षभरापासून आपण कोरोनाच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे, असे सांगून ठाकरे यांनी म्हटले आहे की, केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही.