शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

जिंदालमधील आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार; मृतांना ५ लाखांची मदत, एकनाथ शिंदेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 18:36 IST

दोन कामगारांचा मृत्यू, 17 जणांना केले रेस्क्यू

- पुरुषोत्तम राठोड/ विक्रम पासलकर 

घोटी/गोंदे दुमाला (जि नाशिक): इगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाला-वाडीव-हे औद्योगिक वसाहतीत तुलनेने सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेल्या मुंढेगाव शिवारातील आणि मुंबई आग्रा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म प्रा लिमिटेड या कारखाण्यातील पॉलीफायर या प्लांटला आज सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून 17 जणांना रेस्क्यू करण्यात आले. दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे भेटीप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. घटनेतील मृतांना 5 लाखांची मदत देण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले. 

या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे धुराचे मोठे लोळ वरती आकाशात निघत होते. ही आग पुढे पाच हजार लीटर क्षमता असलेल्या केमिकलयुक्त दोन्ही टाकयांना भिनली. त्यामुळे आगिने अजुनच जास्त भड़का घेतला. या दोन्ही टाक्या जळून खाक झाल्यामुळे  मोठ मोठे स्फोट होऊन सुमारे दहा किमीपर्यंत गावांमध्ये जोरदार हादरे बसून भीतीयुक्त वातावरण तयार झाले होते. दौंडत,मुंढेगाव, माणिकखांब,मुकणे, पाडळी देशमुख,शेनवड खुर्द,पाडळी फाटा आदि सुमारे नऊ ते दहा गावचे नागरिक भयभीत झाले. घरातील भांडे, इतर समान हादरे बसून खाली पडल्यामुळे क्षणभर भूकंप झाला की क़ाय यामुळे नागरिकांना काहीही कळत नव्हते.

विशेष म्हणजे ज्या दोन केमिकल युक्त टाकया जळून खाक झाल्या त्यांचे शेजारिच हजारों टन स्क्रैप मटेरियल ने पेट घेवुन आग वाढत आहे तर तिथेच सुमारे अठरा हजार लीटर क्षमतेची केमिकल भरलेली एक मोठी टाकी असुन आग त्या टाकी पर्यंत जात आहे. जर या टाकिने  पेट घेवुन भड़का झालाच तर कारखान्यातील एक पेट्रोल पंप आणि इतर सर्वच ठिकाणी आग लागण्याची चीन्हे दिसत आहे. मुंढेगाव आणि मुकणे या गावाना धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी प्रशासनाने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.

आज सायंकाळी साडेपाच वाजे पर्यंत आग आटोकयात येण्याची कोणतीही चीन्हे दिसली नाही.  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी डी गंगाधरण, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचेसह जिल्हाभरातील मुख्य पोलिस यंत्रणा व त्यांचे अधिकारी यांनी घटना स्थळी धाव घेवुन मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.  अग्निशमन बंब,  रुग्णवाहिका या ठिकाणी मदतकार्यासाठी दाखल झाल्या असुन महामार्गाला जत्रे सारखे स्वरूप प्राप्त झाले आहे.   

आकाशात सर्वत्र धुराचे लोळ

या आगीमुळे इगतपुरी तालुक्यातील जवळपास पन्नास गावांच्या परिसरात सूर्य आच्छादन झाल्यामुळे पावसाळी वातावरण तयार झाले होते. सायंकाळ पर्यंत हा परिसर काळोखात बुडाला होता. सर्वत्र रुग्णवाहिका त्यांचे सायरन वाजुन आवाज घुमत होता.

शासकीय आश्रमशाळा तत्काळ केली खाली

कंपनी शेजारिच असलेली आणि राज्यातील एकमेव  तसेच जिल्हाभरातील शासकीय आदिवाशी आश्रमशाळ तिल विद्यार्थ्याना भोजन व्यवस्था करणारी  मुंढेगाव शासकीय निवासी आश्रमशाळा  प्रशासनाने आगीचे स्वरूप बघून तासभरात खाली केली. या ठिकाणी हजारों विद्यार्थी शिक्षण घेतात. स्थानिक शेकडो पालकानी या ठिकाणी आपले पाल्य घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तर जिंदाल मधुन बाहेर पडलेले शेकडो कामगार भयभीत होऊन आश्रयीत झालेले दिसले.कारखान्यातील कामगारांच्या निवासातील घराला स्फोट झाल्यामुळे भयानक हादरे बसले. यात काचा फुटून अनेक कामगार व परिवार जखमी झाल्याचा अंदाज आहे. अंदाजीत साडेतींनशे एकर क्षेत्र असलेल्या जिंदाल कंपनीला या आगीने करोडो रूपयांचे नुकसान झाले असल्याच्या अंदाज आहे. विशेष म्हणजे या कारखान्यात हजारो प्रांतीय कामगार आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNashikनाशिकfireआग