नाशिक : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून, शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव, घाईने घेतलेले निर्णय यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढलेली दिसू नये, म्हणून राज्य शासन आकड्यांची लपवा छपवी करत असल्याचा आरोप राज्याचे माजी जलसंपदामंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने केंद्र शासनाने केलेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना संकटाच्या काळात राज्यातील अनेक मंत्री घराबाहेर पडले नाही. वास्तविक या काळात त्यांचे योगदान मोठे असायला हवे होते, पण तसे झाले नाही. राज्य शासनाने लवकरात लवकर रुग्णांचे स्वॅब घेऊन चाचणी केली असती तर प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली असती, पण प्रशासनाचा समन्वय नसल्याने ते शक्य झाले नाही. पर्यायाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास राज्य शासन अपयशी ठरले आहे. आपले अपयश लपविण्यासाठी अनेक ठिकाणी प्रायव्हेट लॅबला स्वॅब घेऊ दिले जात नाहीत. रुग्णसंख्या वाढलेली दिसू नये यासाठी आकड्यांची लपवा छपवी केली जात आहे. एका अर्थाने राज्य शासन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. प्रायव्हेट लॅबलाही स्वॅब घेण्यास परवानगी देऊन चाचणी करू द्यावी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांवर उपचार करावेत. आकडे लपविण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. राज्य शासनाकडे यंत्रणा पुरेशी नसल्याने अधिकाºयांच्या बदल्या करूनही शासन आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राज्य सचिव लक्ष्मण सावजी आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.शंभर कोटींची मदत तोकडी कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी केवळ १०० कोटींची मदत ही कमी असून, कोकणासाठी भरीव मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोरोनाबाबत केंद्राने योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले असल्याचा दावाही महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला. त्याचप्रमाणे केंद्रातील मोदी सरकारने एक वर्षाच्या कार्यकाळात घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी महाजन यांनी दिली. कलम ३७०, रामजन्मभूमी, नागरिकत्व कायदा यांसारखे ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतले असून, देशातील जनतेने ते शांतपणे स्वीकारले असून, आज देशभरात शांततेचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळेच हे शक्य झाले असल्याचे महाजन यांनी सांगितले.
कोरोनाच्या आकडेवारीबाबत राज्य शासनाकडून लपवा छपवी : गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 21:37 IST
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून, शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव, घाईने घेतलेले निर्णय यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढलेली दिसू नये, म्हणून राज्य शासन आकड्यांची लपवा छपवी करत असल्याचा आरोप राज्याचे माजी जलसंपदामंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.
कोरोनाच्या आकडेवारीबाबत राज्य शासनाकडून लपवा छपवी : गिरीश महाजन
ठळक मुद्देअन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिकशासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभावघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलाभाजपा नेते गिरीश महाजन यांचा सरकारवर आरोप