निऱ्हाळेत आजपासून बुवाजी बाबा यात्रा

By Admin | Updated: August 23, 2015 22:56 IST2015-08-23T22:55:35+5:302015-08-23T22:56:03+5:30

निऱ्हाळेत आजपासून बुवाजी बाबा यात्रा

From here onwards, the Bawaji Baba Yatra will start | निऱ्हाळेत आजपासून बुवाजी बाबा यात्रा

निऱ्हाळेत आजपासून बुवाजी बाबा यात्रा

सिन्नर : तालुक्यातील निऱ्हाळे येथे सोमवारपासून (दि. २४) सुरू होणाऱ्या बुवाजी बाबा यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
प. पू. बुवाजी बाबा पुणेकर यांच्या आशीवार्दाने दरवर्षी येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी बुवाजी बाबा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. सोमवारी सुुरू होणाऱ्या यात्रोत्सवाची दुसऱ्या दिवशी मंगळवारी सांगता होणार आहे.
सोमवारी सकाळी बुवाजी बाबा यांच्या मुखवट्याची गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी देवाचा खेळ हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बबन सांगळे यांनी दिली.(वार्ताहर)

Web Title: From here onwards, the Bawaji Baba Yatra will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.