नामको बँकेच्या चेअरमनपदी हेमंत धात्रक यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST2021-06-09T04:18:21+5:302021-06-09T04:18:21+5:30
नवीन चेअरमन निवडीच्या बैचकीत मावळते चेअरमन विजय साने यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा मांडला. बँकेचा निव्वळ एनपीए ३८ टक्क्यांहून शून्य ...

नामको बँकेच्या चेअरमनपदी हेमंत धात्रक यांची निवड
नवीन चेअरमन निवडीच्या बैचकीत मावळते चेअरमन विजय साने यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा मांडला. बँकेचा निव्वळ एनपीए ३८ टक्क्यांहून शून्य टक्क्यांपर्यंत आणण्यात विद्यमान संचालक मंडळाला यश आल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, नवनिर्वाचित चेअरमन हेमंत धात्रक यांनी संचालक मंडळाचे आभार मानत संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी बँकेची एक परिषद लवकरच नामको बँकेच्यावतीने आयोजित करण्यात येणार असून यात सहकारी बँकांचे प्रश्न व त्यांना येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा करण्यासाठी बँकींग क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्वपक्षीय नेत्यांसह सहकार तज्ज्ञांना निमंत्रित करण्याचा विचार मांडला. यावेळी जनसंपर्क संचालक रजनी जातेगांवकर, संचालक वसंत गिते, सोहनलाल भंडारी, प्रकाश दायमा, शिवदास डागा, सुभाष नहार, अशोक सोनजे, गौतम सुराणा, पुंजाभाऊ सांगळे, राजाभाऊ डोखळे, पंढरीनाथ थोरे आदी उपस्थित होते.
नामको बँकेच्या चेअरमनपदी हेमंत धात्रक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सोहनलाल भंडारी, वसंत गिते, विजय साने रजनी जातेगावकर प्रकाश दायमा, शिवदास डागा, सुभाष नहार, अशोक सोनजे आदी