शहिदाच्या कुटुंबीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:52 IST2018-11-18T17:52:03+5:302018-11-18T17:52:18+5:30

सिन्नर : तालुक्यातील शिंदेवाडी येथील शहीद केशव गोसावी यांच्या कुटुंबास सिन्नर तालुका अ‍ॅग्रो डीलर असोसिएशनतर्फे ६७ हजार १०० रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

Helping the family of Shahidah | शहिदाच्या कुटुंबीयांना मदत

शहिदाच्या कुटुंबीयांना मदत

सिन्नर : तालुक्यातील शिंदेवाडी येथील शहीद केशव गोसावी यांच्या कुटुंबास सिन्नर तालुका अ‍ॅग्रो डीलर असोसिएशनतर्फे ६७ हजार १०० रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या रकमेचा धनादेश शहीदपिता सोमगिर गोसावी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास भदाणे यांनी शहीद जवानाच्या कुटुंबास अर्थसहाय्य करण्याची संकल्पना मांडली. संघटनेचे अध्यक्ष अरूण शेळके, उपाध्यक्ष शाम कातकडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर शनिवार (दि.१७) रोजी शहीद केशव गोसावी यांच्या शिंदेवाडी येथील घरी जावून पदाधिकाºयांनी गोसावी कुटुंबाचे सांत्वन करत ही मदत दिली. यावेळी कृषी अधिकारी कैलास भदाणे, संघटनेचे अध्यक्ष अरूण शेळके, उपाध्यक्ष शाम कातकडे, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, शांताराम कोकाटे, प्रभाकर चकोर, दत्तात्रय सोनवणे, सुदाम खताळे, भाऊसाहेब खाडे, रोहिदास हांडोरे, अमित गिते, संपत गायकवाड, ज्ञानेश्वर नागरे, राहुल कथले, गणेश खेलुकर, नितीन बहिरट, बाबासाहेब गोडगे आदींसह. अ‍ॅग्रो डीलर असोसिएशनचे सभासद यावेळी उपस्थित होते.

Web Title: Helping the family of Shahidah

टॅग्स :Nashikनाशिक