धुळगाव ते पंढरपूर बस परिसरातील वारकर्यांना घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 22:00 IST2019-07-06T21:59:38+5:302019-07-06T22:00:37+5:30
येवला : धुळगाव येथुन धुळगाव ते पंढरपूर एस टी महामंडळाची बस परिसरातील वारकर्याना घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान महाराज गायकवाड यांच्या पुढाकारातून ही बस आषाढी वारी यात्रेसाठी रवाना झाली.

आगारप्रमुख समर्थ शेळके यांचा सत्कार करताना एकनाथ गायकवाड.
येवला : धुळगाव येथुन धुळगाव ते पंढरपूर एस टी महामंडळाची बस परिसरातील वारकर्याना घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान महाराज गायकवाड यांच्या पुढाकारातून ही बस आषाढी वारी यात्रेसाठी रवाना झाली.
येवला बस डेपोने बस दिल्याने आगार प्रमुख समर्थ शेळके यांचा वारकर्यांच्या वतीने सुभाष गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पढंरपुरला जाणार्या यांत्रेकरूना कॉग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या व चालक संदीप मोरे वाहक विलास पाटील यांचा सत्कार केला.
या वेळी वाल्मीक जाधव, भास्कर गायकवाड, नानासाहेब साठे, विनायक गायकवाड, सुनिल पाटील, खंडेराव खोडके, साम्राज्ञी पाटील हे उपस्थीत होते.