आदिवासी कुटुंबांना मदत
By Admin | Updated: April 30, 2017 23:02 IST2017-04-30T23:01:53+5:302017-04-30T23:02:03+5:30
येवला : शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी येथील युवकांनी क्रि केट चषक या क्रिकेट सामन्याचे आयोजन करून जमा झालेल्या निधीतून आदिवासींना मदत करण्यात आली.

आदिवासी कुटुंबांना मदत
येवला : तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी व दुष्काळाचा दाह कमी करण्याच्या हेतूने येथील युवकांनी शिंदेपाटील क्रि केट चषक या राज्यस्तरीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करून यानिमित्त जमा झालेल्या निधीतून आदिवासींना मदत करण्यात आली.
प्रारंभी येवला शहर तालुक्यातील गरजू १०१ ग्रामस्थांना गहू, तांदूळ, तेल, साखरेसह संपूर्ण ५५ किलो वजनाच्या ५ हजार रुपये किमतीच्या किराणा मालाचे वाटप करण्यात आले. शहर व तालुक्यातीलगरीब नागरिक व शेतकऱ्यांना ही मदत शुक्र वारी देऊन क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन केले.
येवला तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढा किराणा सामान देऊन शिंदे पाटील क्रिकेट चषकाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, मनमाड पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शुक्रवारी (दि. २८) संध्याकाळी ७ वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, राजेंद्र लोणारी, सामाजिक कार्यकर्ते निंबा वाणी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार कल्याणराव पाटील, जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे कुणाल दराडे यांनी शिंदेपाटील क्रिकेट चषक समितीच्या उपक्रमाची स्तुती केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक किशोर दराडे, संजय सोमासे, रामेश्वर हाबडे, बाळू परदेशी, शैलेश देसाई, प्रशांत शिंदे, अल्केश कासलीवाल आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी, प्रस्तावना राजेंद्र बाकळे यांनी केली. यावेळी शहरातील क्रिकेटप्रेमींसह, आदिवासी महिला व कुटुंबप्रमुख आपल्या परिवारासह उपस्थित होते. या मदत मिळालेल्या कुटुंबांना संकटाच्यावेळी हातभार लागल्याने त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. (वार्ताहर)