मेंढपाळांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:45 IST2020-04-24T22:27:52+5:302020-04-24T23:45:25+5:30
सायखेडा : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद असल्यामुळे मेंढपाळांना मेंढ्या विकण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

मेंढपाळांना मदत
सायखेडा : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद असल्यामुळे मेंढपाळांना मेंढ्या विकण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बाजार सुरू नसल्याने दैनंदिन खर्चासाठी तसेच किराणा, धान्य खरेदीसाठी पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या सायखेडा शिवारातील मेंढपाळांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष भाऊसाहेब ओहळ यांच्या हस्ते किराणा आणि धान्याचे शेतात जाऊन वाटप करण्यात आले.
कोरोना रोगाच्या प्रसारामुळे अनेक गावे, शहरे बंद आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानावर झाला असून, त्यांना दैनंदिन जीवनासाठी लागणारा पैसा, धान्य, किराणा अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील शेतमजूर, छोटे व्यावसायिक, सलून दुकानदार यांच्या दैनंदिन जीवनमानावर मोठा परिणाम झाला आहे.