Help from the saffron group of Kalyan | कळवणच्या भगवा ग्रुपकडून मदत

कळवणच्या भगवा ग्रुपकडून मदत

कळवण - येथील भगवा सोशल ग्रुपने यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने श्रीराम जन्मोत्सव साधेपणाने साजरा करुन ५० गरजू कुटुंबाना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.
लॉकडाऊन परिस्थितीत कळवण शहराच्या विविध भागात परजिल्'ातील व परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने अडकून पडले आहेत, त्यांचा रोजगार बंद असल्यामुळे हातात पैसा नाही, अन्नधान्य संपले आहे. त्यांना पोट भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यांना भगवा सोशल ग्रूपने रामनवमी निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून तो पैसा जीवनाश्यक वस्तू घेण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेऊन त्यातून जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला घेऊन दिला तसेच नगरपंचायत कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना मास्क वाटप केले. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी सचिन माने, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, माजी सरपंच अजय मालपुरे, कमको बँक संचालक योगेश मालपुरे, दीपक महाजन आदींसह ग्रुपचे नंदन मालपुरे, चेतन मालपुरे, सागर कोठावदे, भय्या मालपुरे, वैभव कोठावदे, प्रथम जुन्नरे, परेश मालपुरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title:  Help from the saffron group of Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.