‘यदा कदाचित रिटर्न’कडून अनाथ बालकांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:37 IST2019-08-22T00:37:28+5:302019-08-22T00:37:46+5:30
‘यदा कदाचित रिटर्न’ या नाटकाच्या नाशिक येथील प्रयोगाच्या निमित्ताने खंबाळे येथील आधारतीर्थ या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील बालकांच्या आश्रमाला दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य त्यांना मदत म्हणून देण्यात आले.

‘यदा कदाचित रिटर्न’कडून अनाथ बालकांना मदत
नाशिक : ‘यदा कदाचित रिटर्न’ या नाटकाच्या नाशिक येथील प्रयोगाच्या निमित्ताने खंबाळे येथील आधारतीर्थ या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील बालकांच्या आश्रमाला दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य त्यांना मदत म्हणून देण्यात आले.
संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर आहेत. त्यांनी पुढाकार घेत नाशकात प्रयोगावेळी ही मदत देण्यात आली. नाटकाप्रसंगी उपस्थित माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाटकाच्या निर्मात्यांसह सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी दाखवलेल्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. याप्रसंगी कैलास कमोद, नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर, संतोष पवार, जयप्रकाश जातेगावकर, अरु ण जातेगावकर उपस्थित होते.