आयएमएकडून बिटको रुग्णालयास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:33 IST2020-04-29T22:33:11+5:302020-04-29T23:33:16+5:30
नाशिकरोड : इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकरोडतर्फे मनपाच्या बिटको हॉस्पिटल व झाकीर हुसेन हॉस्पिटलला रुग्णांच्या तपासणीसाठी वैद्यकीय साहित्याची मदत करण्यात आली.

आयएमएकडून बिटको रुग्णालयास मदत
नाशिकरोड : इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकरोडतर्फे मनपाच्या बिटको हॉस्पिटल व झाकीर हुसेन हॉस्पिटलला रुग्णांच्या तपासणीसाठी वैद्यकीय साहित्याची मदत करण्यात आली. महानगरपालिकेत सेवा देणाऱ्या डॉक्टर व कर्मचारी यांच्यावरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिकूल परिस्थितीत ते रुग्णांना आरोग्य सेवा देत आहेत. अशावेळी सेवा देणाºया डॉक्टरांनी व कर्मचारी यांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. हाच संदर्भ लक्षात घेता डॉक्टर राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयएमए नाशिकरोडचे अध्यक्ष डॉ. मयूर सरोदे, सचिव डॉ. दीपाली पाटोळे व त्यांच्या सहकाºयाकडून दोन इन्फ्रारेड थर्मामीटर, ४० फेस शिल्ड, दोनशे थ्री प्लाय मास्क असे एकूण २५ हजारांचे वैद्यकीय साहित्याची बिटको हॉस्पिटल व झाकीर हुसेन रुग्णालयांना मदत करण्यात आली. यावेळी बिटको हॉस्पिटलचे डॉ. मनोज चौधरी, डॉ. शिल्पा काळे, डॉ. धनेश्वर जितेंद्र, डॉ. मेलिटा एलिया, डॉ. शलाका बागुल, डॉ. मयुरी गलांडे, डॉ. प्रेरणा शिंदे तसेच झाकीर हुसेन हॉस्पिटलच डॉ. नितीन रावते, डॉ.जयंत फुलकर यांच्यासह नाशिकरोड आयएमएचे सहसचिव डॉ. प्रशांत पाटोळे, युवराज राजमान आदी उपस्थित होते.