आघार-ढवळेश्वर ग्रामपंचायतीला मदत
By Admin | Updated: April 7, 2016 23:55 IST2016-04-07T22:57:34+5:302016-04-07T23:55:48+5:30
साई दूध गिरणा संघ : प्रत्येकी अकरा हजारांचे योगदानं

आघार-ढवळेश्वर ग्रामपंचायतीला मदत
मालेगाव : तालुक्यात साई गिरणा दूध संघाच्या वतीने आघार बुद्रुक व ढवळेश्वर दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी अकरा हजार रूपये कर स्वरूपात देऊन सन २०१६-१७ चा विक्रीकर माफ करण्यात येऊन शेतकरी व विक्रेत्यांना
दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मालेगाव शेतकी संघाचे अध्यक्ष समाधान हिरे यांनी
सांगितले.
कधी अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे तर कधी अवकाळी पावसामुळे शेतकरी व नागरिक होरपळत आहेत. अशा बिकट संकटांना तोंड देण्यासाठी अनेक संस्था झटत आहेत.
याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील आघार बुद्रुक व ढवळेश्वर ही दुष्काळग्रस्त गावेही या समस्यांना तोंड देत आहेत. यासाठी या गावांतील आठवडे बाजाराचा लिलाव न होऊ देता आणि आठवडे बाजाराला येणारे विक्रेते हे शेतकरी बांधव आहेत या भावनेतून दुष्काळाची
दाहकता लक्षात घेऊन शेतकरी, विक्रेत्यांना त्याची झळ बसू नये
तसेच ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाला देखील अडथळा येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मालेगाव तालुका शेतकी संघाचे अध्यक्ष समाधान हिरे यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाने व्यापार वाढीस उत्तेजन मिळत आहे व संपूर्ण तालुक्यातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
(वा. प्र.)