शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

हेल्मेट सक्ती मोहिममुळे सव्वा लाखांची दंड वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 18:11 IST

देवळा : जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत देवळा शहर व तालुक्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर १०३ विना हेल्मेट दुचाकी चालक, तसेच सीट बेल्ट, व नियमभंग करणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत सव्वा लाख रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदेवळा : तालुक्यात विद्यार्थीनी, महीलांच्या डोक्यावर दिसूलागल्या हेल्मेट

देवळा : जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत देवळा शहर व तालुक्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर १०३ विना हेल्मेट दुचाकी चालक, तसेच सीट बेल्ट, व नियमभंग करणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत सव्वा लाख रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.ग्रामीण भागातील दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची सवय नसल्यामुळे त्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीमुळे आयुष्यात पहिल्यांदाच हेल्मेट परिधान करावे लागले असून यामुळे अनेक गंमतीदार प्रसंग घडत आहेत.देवळा तालुक्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी मोहीम राबविण्यात आली असून विना हेल्मेट, सीट बेल्ट न लावणे, व वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाºया चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. व नियम मोडणाºया चालकांकडून सव्वा लाख रु पयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.हेल्मेटच्या सक्तीमुळे देवळा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यालगत पूरक व्यवसाय म्हणून अनेक व्यावसायिकांनी हेल्मेट विक्र ीची दुकाने थाटली आहेत.कारवाईच्या भीतीने का होईना वाहनचालक शिस्तीचे पालन करतांना दिसत आहेत. सदर मोहीम त्रासदायक असली तरी हेल्मेट सक्तीचे महत्व नागरीकांना पटू लागले असून तशी चर्चा नागरीकांमध्ये होत आहे.चौकट.....१) विना हेल्मेट चालकांना पोलिसांनी अडविल्यानंतर काही चालक तातडीने जवळपास असलेल्या एखाद्या दुकानातून हेल्मेट खरेदी करून दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करतात.काही दुचाकीस्वारांना सवय नसल्यामुळे हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवणे त्रासदायक होत असल्यामुळे हे दुचाकीस्वार हेल्मेट आपल्या दुचाकीवर बाळगतात परंतु पोलिस दिसले कि पटकन हेल्मेट परीधान करून कारवाई टाळतात व थोडे पुढे गेल्यावर हेल्मेट पुन्हा डोक्यावरून काढून टाकतात. यामुळे मोहीमेचा उद्देश सफल होत नाही,यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.२) ग्रामीण भागातील एका दुचाकी चालकाने हेल्मेट असूनही ते परिधान केलेले नसल्यामुळे त्यास हटकले, व हेल्मेट का घातले नाही अशी विचारणा केली. त्यावेळी मला सुतक पडलेले असल्यामुळे डोक्यावर हेल्मेट घालता येत नाही असे उत्तर चालकाने दिले. देवळा शहरात विद्यार्थीनी व महीला देखील आता दुचाकीवर हेल्मेट परीधान करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.कोट....कारवाई वेळी वाहनधारकांना सीटबेल्ट व हेल्मेट परिधान करणे विषयी समुपदेशन करण्यात येत आहे.दुचाकी चालकांनी हेल्मेट परीधान करूनच दुचाकी चालवावी व आपल्या जिवीताची काळजी घ्यावी, दंडात्मक कारवाई टाळावी. हि कारवाई देवळा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात यापुढेही सुरूच राहणार आहे.- सुरेश सपकाळ,पोलीस निरीक्षक देवळा.