शहरातून हेल्मेट जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:55 IST2017-08-17T00:52:53+5:302017-08-17T00:55:32+5:30
नाशिक : रस्ते अपघातापासून सुरक्षिततेसाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, असा संदेश देणाºया हेल्मेट जनजागृती फेरीचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. पोलीस कवायत मैदान येथून या फेरीला सुरुवात करण्यात आली. स्वत: पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हेल्मेट घालून काही वेळ दुचाकीवर प्रवास केला.

शहरातून हेल्मेट जनजागृती फेरी
नाशिक : रस्ते अपघातापासून सुरक्षिततेसाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, असा संदेश देणाºया हेल्मेट जनजागृती फेरीचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. पोलीस कवायत मैदान येथून या फेरीला सुरुवात करण्यात आली. स्वत: पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हेल्मेट घालून काही वेळ दुचाकीवर प्रवास केला. नाशिक पोलीस आयुक्तालयाने या फेरीचे आयोजन केले होते. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते. पोलीस कवायत मैदान येथून निघालेल्या फेरीचा गंगापूररोड, कॉलेजरोड, त्र्यंबकरोड मार्गे गोल्फ क्लबवर समारोप करण्यात आला. या फेरीत विद्यार्थी, मोटारसायकल रायडिंग क्लब आदींनी भाग घेतला.