शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

शासनाकडून ‘भोसला’ला हेलिकॉप्टरची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:41 IST

महाराष्ट शासन लिखित निळ्या रंगाचे जुने भूमिस्थ डॉफिन एएस-३६५ एन व्हीटी एमजीके हेलिकॉप्टर मुंबईहून एका कंटेनरवरून शहरात आणले गेले. राज्य शासनाकडून जुने झालेले हेलिकॉप्टर भोसला सैनिकी शाळेला देणगी स्वरूपात दिले गेले.

नाशिक : महाराष्ट शासन लिखित निळ्या रंगाचे जुने भूमिस्थ डॉफिन एएस-३६५ एन व्हीटी एमजीके हेलिकॉप्टर मुंबईहून एका कंटेनरवरून शहरात आणले गेले. राज्य शासनाकडून जुने झालेले हेलिकॉप्टर भोसला सैनिकी शाळेला देणगी स्वरूपात दिले गेले. सैनिकी शाळा असल्यामुळे येथे प्रदर्शित करण्यासाठी हेलिकॉप्टर देण्यात आल्याची माहिती सहकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी दिली.सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला सैनिकी शाळेला राज्य शासनाकडून जुने हेलिकॉप्टर प्रदर्शित करण्यासाठी दिले गेले. रविवारी (दि.१६) दुपारी मुंबईहून एका १८चाकी कंटेनरवरून हेलिकॉप्टर नाशिकमध्ये दाखल झाले. भोसला स्कूलच्या आवारात कंटेनर दाखल होताच स्वागत करण्यात आले.पोलीस आयुक्तालय हद्दीत विल्होळी येथे कंटेनर पोहोचताचतेथून पुढे थेट भोसला सैनिकी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बंदोबस्त देण्यात आला होता. हेलिकॉप्टरचे पंखे काढून घेण्यात आले असून, निळ्या रंगाचे हेलिकॉप्टर भोसला सैनिकी शाळेत रविवारी पोहोचले. यासाठी कार्यवाह हेमंत देशपांडे, बेलगावकर यांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती.हेलिकॉप्टरची वाहतूक मुंबई ते नाशिक एका कंटेनरवरून करण्यात आली. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करताना हे निळे हेलिकॉप्टर अनेकांच्या कुतुहलाचा विषय ठरला. हेलिकॉप्टर शहराच्या हद्दीत आले तेव्हा प्रत्येक चौकामध्ये नागरिकांकडून या कंटेनरवर स्वार हेलिकॉप्टरचे मोबाइलमधून छायाचित्र काढले जात होते.विद्यार्थ्यांमध्ये उत्साहउन्हाळी सुटीनंतर सोमवार (दि.१७) पासून शाळा सुरू होणार असून, यानिमित्ताने विद्यार्थी तब्बल महिनाभरानंतर शाळेच्या आवारात प्रवेश करणार आहेत. शालेय मुलांसाठी नवीन असलेल्या या हेलिकॉप्टरसोबत सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहू शकतो.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक