येवला तालुक्यात झाले मुलीच्या जन्माचे जोरदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:50 IST2019-01-27T22:49:54+5:302019-01-27T22:50:42+5:30
येवला : तालुक्यातील वाल्मिक शेळके यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माचे स्वागत भजन कीर्तन गोड जेवणाची मेजवानी करून केले. विशेष म्हणजे त्यांचे आजोबा भागूजी शेळके वडील धोंडिबा शेळके यांच्यासह गेल्या तीन पिढ्यांना एकही मुलगी झालेली नव्हती म्हणून मोठ्या उत्साहात मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे.

स्त्री जन्माच्या स्वागतासाठी घरात सुरु असलेले भजन कीर्तन.
येवला : तालुक्यातील वाल्मिक शेळके यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माचे स्वागत भजन कीर्तन गोड जेवणाची मेजवानी करून केले.
विशेष म्हणजे त्यांचे आजोबा भागूजी शेळके वडील धोंडिबा शेळके यांच्यासह गेल्या तीन पिढ्यांना एकही मुलगी झालेली नव्हती म्हणून मोठ्या उत्साहात मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवत्ती तशी या समाजात जुनीच आहे. मुलगा जन्माला आला म्हणजे पेढे वाटले जातात आणि मुलगी जन्माला आल्यास चेहरा वाकडा केला जातो. ही आपल्या स्त्रीकडे बघण्याची विसंगत दृष्टीच आता आपल्याला पश्चात्ताप करायला लावत आहे. या सर्व गोष्टीला शेळके अपवाद ठरले आहे. आपणच मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा असे शेळके यांनी सांगितले.
यावेळी भजन, ह.भ.प.अण्णासाहेब गायकवाड यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आल होते. मुलगी झाल्याच्या आनंद सोहळ्याप्रसंगी धारासिंग गायकवाड, भगवान गायकवाड, चांगदेव गायकवाड, रवींद्र महाले, भगवान भोसले, सुधाकर गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, दादासाहेब गायकवाड, माधव सोनवणे, नारायण गायकवाड, हरिदास पवार, गोरख गायकवाड, गोविंद गायकवाड, आबासाहेब सोनवणे, विजय सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, लता शेळके, अंर्जना शेळके, रत्ना शिंदे, विठ्ठल शेळके आदी सहभागी झाले होते.