समृद्धीच्या अवजड वाहनांनी रस्त्यांची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:45+5:302021-05-08T04:14:45+5:30
तालुक्यातील चापडगाव येथील ग्रामस्थांनी डम्पर अडवून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न दोन दिवसापूर्वी घडल्याचे समजते. संबंधित रस्ते विकासक कंपनीने परिसरातील रस्त्यांचे ...

समृद्धीच्या अवजड वाहनांनी रस्त्यांची झाली दुरवस्था
तालुक्यातील चापडगाव येथील ग्रामस्थांनी डम्पर अडवून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न दोन दिवसापूर्वी घडल्याचे समजते. संबंधित रस्ते विकासक कंपनीने परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करून देण्याची मागणी केली आहे. गत आठवड्यात दापूर व चापडगाव परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच परिसरातून समृद्धी महामार्गासाठी लागणारी शेकडो डम्पर माती वाहून नेली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी डम्पर अडवून वाहतूक रोखली होती. पाऊस पडल्यानंतर होणारा चिखल त्या चिखलात दुचाकी घसरून अपघात होत आहेत. रस्त्यावर पाणी न मारल्यामुळे धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्गावरून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. वाहने तर सोडाच पायी चालणेदेखील मुश्कील झाले आहे. समृद्धी महामार्गाचे डम्पर दिवस-रात्र चालू आहेत. त्यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. त्यामुळे वैतागलेल्या परिसरातील नागरिकांनी समृद्धी महामार्गाचे डम्पर अडवून वाहतूक बंद केली. जोपर्यंत ग्रामीण भागातील रस्त्यांचे डांबरीकरण होत नाही तोपर्यंत वाहतूक करता येणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती.
इन्फो...
रस्ते झाले धूळमय!
सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तालुक्याच्या अनेक भागातून समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी डम्परमधून मातीची वाहतूक होत आहे. या वाहतुकीदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती सांडत आहे. या मातीचे धुळीत रूपांतर होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या नाकातोंडात व डोळ्यात धूळ जात आहे, तर अंगावरील कपडेदेखील धुळीने माखत असून प्रवाशांना याचा गंभीर त्रास होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी वाहतूक करणारे डम्पर भरधाव वेगाने सुरू असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, याकडे मातीची वाहतूक करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून दुर्लक्ष होत आहे.
फोटो ओळी : ०७ नांदूरशिंगोटे१
चापडगाव परिसरात समृद्धीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था.
===Photopath===
070521\07nsk_26_07052021_13.jpg
===Caption===
चापडगाव परिसरात समृध्दीच्या वाहतूकीमुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था