मुसळधार पावसाने शहराला झोडपले

By Admin | Updated: June 4, 2014 01:45 IST2014-06-04T01:19:54+5:302014-06-04T01:45:57+5:30

नाशिक : संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरासह उपनगरांना रोहिणी नक्षत्राच्या मुसळधार पावसाने झोडपले. सकाळपासूनच वातावरणात उष्मा वाढल्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता.

Heavy rains thundered the city | मुसळधार पावसाने शहराला झोडपले

मुसळधार पावसाने शहराला झोडपले

 

नाशिक : संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरासह उपनगरांना रोहिणी नक्षत्राच्या मुसळधार पावसाने झोडपले. सकाळपासूनच वातावरणात उष्मा वाढल्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार संध्याक ाळी शहरात वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार सलामी दिली. वादळ वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह दुपारी साडेचार वाजेनंतर शहराला पावसाने तडाखा दिला. नाशिकरोड, देवळाली कॅम्प, अंबड, पाथर्डी फाटा, द्वारका, जुने नाशिक, पंचवटी, सीबीएस, कॉलेजरोड, शरणपूररोड, सातपूर, आनंदवल्ली, गंगापूर, गिरणारे आदि भागांत सुमारे तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. साडेपाच वाजेच्या सुमारास वरील भागात पावसाला प्रारंभ झाला. वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने या परिसराला झोडपले. त्यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ झाली व विक्रेत्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसाचे आगमन होताच महावितरण कंपनीने नेहमीप्रमाणे ‘दक्षता’ दाखवून काही भागांतील वीजपुरवठा तातडीने खंडित करणे पसंत केले. उपनगर, डीजीपीनगर, वडाळागाव, इंदिरानगर, सिडको, पाथर्डी, वडाळागाव, डीजीपीनगर, उपनगर या भागांमध्ये सोसाट्याचा वारा पावसाच्या तुलनेत अधिक होता. त्यामुळे अवघी दहा-पंधरा मिनिटे या भागात पावसाच्या हलक्या, तर कोठे मध्यम सरी कोसळल्या. तपोवन, टाकळी, टाकळीरोड या भागात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला व किरकोळ गारपिटीचाही फटका बसला. जेलरोड, पंचवटी, म्हसरूळ, मुंबईनाका परिसरात काही वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Heavy rains thundered the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.