नाशिक : मालेगाव आणि दिंडोरी शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. दिंडोरीत धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.दिंडोरी तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पेरण्या खोळंबल्या होत्या व झालेल्या पेरण्या व भाजीपाला लागवड पावसाअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. शुक्र वारी (दि.१९) सायंकाळी व रात्री खेडगाव कादवा कारखाना, मातेरेवाडी, लोखंडेवाडी, जोपूळ, जानोरी, मोहाडी तळेगाव, खतवड दिंडोरी आदी भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र पावसाचे माहेरघर समजल्या जाणाºया पश्चिम भागातील पाणलोट क्षेत्रात अल्प पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढू शकला नाही.पूर्व भागात झालेल्या पावसामुळे विविध ओहोळ, नाल्यांना पूर आला, तर शनिवारी (दि.२०) निळवंडी, पाडे, हातणोरे, मडकीजांब जंबुटके परिसरात चांगला पाऊस झाल्याने कोळवन व धामण नदीलाही पूर आल्याने पालखेड धरणात पाणीसाठा वाढत आहे. शनिवारी दुपारी १२च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग दोन तास जोरदार पाऊस सुरू होता. जोपूळ, धामणवाडी परिसरात झालेल्या पावसाने धामणवाडी येथील ओहोळाला पूर आला. त्यामुळे जोपूळ-पिंपळगाव रस्ता पाण्याखाली गेला होता.मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने शनिवारी मालेगाव शहर व तालुक्यात दमदार हजेरी लावली. दाभाडी, टेहरे, पाटणे, वडनेर, खाकुर्डी परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला होता. मात्र शनिवारी शहर व तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. शहरातील उंच सखल भागात पाणी साचले होते. सोयगाव नववसाहत भागातील कॉलन्या व रस्ते जलमय झाले होते. विद्यार्थ्यांना पावसातुन वाट काढावी लागत होती ग्रामीण भागातही पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते.रस्त्याच्या गुणवत्तेचे पितळ उघडदिंडोरी, पालखेड, लोखंडेवाडी, जोपूळ, पिंपळगाव तसेच लखमापूर, कादवा कारखाना, खेडगाव रस्त्याचे नुकतेच नूतनीकरण झाले. मात्र सदर रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तक्र ारी होत्या. त्यातच काही ठिकाणी सिलकोट करणे बाकी राहिल्याने सदर रस्ता पावसात उखडून गेला आहे. पुन्हा खड्डे पडू लागले आहे.दाभाडी परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाला. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते तर नाले ओसंडून वाहत होते. या पावसामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.
मालेगाव, दिंडोरी तालुक्यात जोरदार पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:58 IST
मालेगाव आणि दिंडोरी शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. दिंडोरीत धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही.
मालेगाव, दिंडोरी तालुक्यात जोरदार पावसाचा तडाखा
ठळक मुद्देपाणलोट क्षेत्रात प्रमाण कमी ; धरणसाठ्यात वाढ नाही