शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसाचा नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूकीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:44 IST

नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले होते. रात्री आठ वाजेनंतर रेल्वे मार्ग (डाऊन) हळुहळु पर्वपदावर येऊ लागला; मात्र रेल्वेमार्ग (अप लाइन) वरील वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्दे‘अप लाईन’वरील वाहतूक पुर्वपदावर येऊ शकली नाहीरेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेअस्वली रेल्वेस्थानकातील रूळ पुर्णपणे पाण्यात बुडाले

नाशिक : शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे बुधवारी (दि.२५) दूपारनंतर मध्य रेल्वेची भुसावळ-नाशिक-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूकीवर परिणाम होण्यास सुरूवात झाली. सायंकाळनंतर मात्र रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याने प्रवाशांना रेल्वेस्थानकावर अडकून प्रतीक्षा करावी लागली. देवळाली कॅम्प, अस्वली या रेल्वेस्थानकावरील रूळ पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. बहुतांश रेल्वेगाड्या लासलगाव, चाळीसगाव, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत ‘अप लाईन’वरील वाहतूक पुर्वपदावर येऊ शकली नाही.शहरासह सिन्नर, इगतपुरी, कळवण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वेमार्गांवर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. यामुळे नाशिक-मुंबई मार्गावरील ‘अप-डाऊन लाइन’ पुर्णपणे बंद झाली. गोदावरी, सेवाग्राम, तपोवन या रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई येथून पुढे सोडण्यात आल्या; मात्र या गाड्यांनाही इगतपुरी रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पंचवटी एक्सप्रेसदेखील नाशिकच्या दिशेने उशिरा धावली. तसेच कानपूर (एल.टी.टी) गाडी नाशिकरोड स्थानकात तर तपोवन एक्सप्रेस देवळाली, कामयानी एक्सप्रेस लासलगाव वाराणसी, हरिद्वार या दोन्ही गाड्या चाळीसगाव रेल्वे स्थानकात थांबविण्यात आल्या होत्या. नाशिक शहरातदेखील जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांना पडणे मुश्कील झाले होते. परिणामी प्रवाशांना पावसाचा जोर कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली. नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले होते.रात्री आठ वाजेनंतर रेल्वे मार्ग (डाऊन) हळुहळु पर्वपदावर येऊ लागला; मात्र रेल्वेमार्ग (अप लाइन) वरील वाहतूक ठप्प झाली होती. देवळाली कॅम्पपासून पुढे अस्वली रेल्वेस्थानकातील रूळ पुर्णपणे पाण्यात बुडाले होते. यामुळे मुंबईकडे जाणारी व नाशिककडे येणारी रेल्वे वाहतूकीला मोठा फटका बसला.--जोरदार पावसाने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेअचूक वेळेवर धावणारी रेल्वेची गती जोरदार पावसामुळे चांगलीच मंदावली. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. मुंबईहून नाशिककडे येणा-या सर्वच गाड्या उशीरा धावल्या. तसेच भुसावळपासून नाशिकमार्गे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूकदेखील विस्कळीत झाल्याने रेल्वेगाड्यांच्या वेळा चुकल्या. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत स्थानकात पावसाच्या उघडीपीची प्रतीक्षा करावी लागली.

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिकRainपाऊसMumbaiमुंबईNashik Floodनाशिक पूर