दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 14:52 IST2020-06-30T14:52:26+5:302020-06-30T14:52:49+5:30

देवगाव : देवगाव व परिसरात तब्बल पंधरा दिवसानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून शेतकऱ्यांना मोठा ...

Heavy rains bring relief to farmers | दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

ठळक मुद्देपंधरा दिवसानंतर हजेरी : दुबार पेरणीचे संकट टळले

देवगाव : देवगाव व परिसरात तब्बल पंधरा दिवसानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त केले आहे.
यावर्षी जूनच्या सुरूवातीला चांगला पाउस झाल्याने देवगाव व परीसरातील शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी उरकली. कोरोना व लॉकडाऊनचा सामना करत पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली. काही शेतकºयांनी हात उसनवारीने तर काहींनी पिकांच्या उत्पन्नातून बियाण्याचे पैसे देण्याचा वायदा करून तसेच काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवलेल्या पैश्यातून बियाण्याची खरेदी केली. पेरणीनंतर मात्र पावसाने पंधरा ते वीस दिवस पाठ फिरवल्याने पिके पिवळी पडू लागल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय? या विवंचनेत शेतकºयांची चिंता वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून आकाशात रोज ढग दाटून येत होते. मात्र पाऊस पडत नव्हता मात्र दोन दिवसापासून उकाडा होत होता. हवा बंद व दमट वातावरण निर्माण होऊन सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सायंकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली.
नऊ वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने देवगाव व परीसरात पिकांना मोठा आधार मिळाला. या जोरदार पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पाऊस जोरदार असल्याने पिकांवरील काही प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव कमी होईल, असे मत व्यक्त करत शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसले. यापुढे पर्जन्यमान चांगले राहून खरीप उत्पादन वाढण्याची शेतकरी वर्गास अपेक्षा आहे.
चौकट...
झालेल्या पावसाने प्रामुख्याने पेरणी झालेल्या सोयाबीन तसेच मका, टोमॅटो या पिकाला मोठा फायदा होणार आहे. पर्जन्यवृष्टी झाली असल्याने खरीप पिकांना आधार लाभला आहे. त्यामूळे दुबार पेरणीच्या संकटातून सुटका झाल्याने शेतकºयांना दिलासा लाभला आहे. काही भागात विहिरींना देखील पाणी उतरण्यास प्रारंभ झाला असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
चौकट...
देवगाव व परिसरात आतापर्यंत ७५ ते ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत पेरण्यांनाही शेतकºयांनी गती दिली आहे. यावर्षी शेतकºयांनी सोयाबीन लागवडीस अधिक प्राधान्य दिले असून त्यापाठोपाठ टोमॅटो, मका, भुईमूग लागवडीकडे शेतकºयांचा कल दिसून आला आहे.

Web Title: Heavy rains bring relief to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.