सप्तशृंगगडावर मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:07 IST2018-03-11T00:07:07+5:302018-03-11T00:07:07+5:30
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर शनिवारी मुसळधार पाऊस झाल्याने भाविकांचे चांगलेच हाल झाले.

सप्तशृंगगडावर मुसळधार पाऊस
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर शनिवारी मुसळधार पाऊस झाल्याने भाविकांचे चांगलेच हाल झाले. सकाळपासूनच वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दिवसभर ऊन-सावल्याचा खेळ सुरू होता. सायंकाळी अचानक पावसाची रिमझिम सुरू झाली, तर सहा वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांसह दुकानदारांचीही चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस सुरू झाल्याने दुकानदारांचे खूपच हाल झाले. बच्चेकंपनीने पावसाचा मनमुराद आनंद घेतला. वादळ व पाऊस जोरदार असल्यामुळे दूकानदारांनी दूकाने बंद केली.