मनमाडला मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 21:34 IST2019-06-26T21:30:40+5:302019-06-26T21:34:40+5:30
मनमाड : शहर व परिसरात बुधवारी (दि.२६) सायंकाळी मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे रात्री शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

मुसळधार पावसाचे आगमन
ठळक मुद्दे या वर्षी समाधानकारक पाऊस व्हावा या अपेक्षेत आहे.
मनमाड : शहर व परिसरात बुधवारी (दि.२६) सायंकाळी मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे रात्री शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
गेल्या तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. तर कमालीचा उकाडा जाणवत होता. मनमाड शहरात बुधवारी अचानक जोरदार पावसाचे आगमन झाल्याने नागरिक सुखावले आहे. सुरवातीला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरु वात झाली.
या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला असून या वर्षी समाधानकारक पाऊस व्हावा या अपेक्षेत आहे.