मालेगाव शहर, तालुक्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:22 IST2018-06-23T00:21:56+5:302018-06-23T00:22:11+5:30
तब्बल २२ दिवस दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी शहर व तालुक्यात दमदार हजेरी लावली. पहिल्याच जोरदार पावसात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पितळ उघडले पडले आहे.

मालेगाव शहर, तालुक्यात दमदार पाऊस
मालेगाव : तब्बल २२ दिवस दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी शहर व तालुक्यात दमदार हजेरी लावली. पहिल्याच जोरदार पावसात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पितळ उघडले पडले आहे. शहरातील उंच, सखल भागात पाण्याचा निचरा झाला नसल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते. दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान तालुक्यातील पोहाणे येथे वीज कोसळून शेतकरी बाबुलाल काशिनाथ बागुल यांच्या मालकीची एक म्हैस ठार झाली. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. शुक्रवारी दुपारी वातावरणात कमालीचा बदल झाला. दुपारच्या सत्रात शहर व तालुक्यातील माळमाथा काटवन भागात पावसाने हजेरी लावली. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. ग्रामीण भागातही पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पेरणीची लगबग सुरू होणार आहे.तालुक्यातील मंडळनिहाय पाऊस मिली मीटरमध्ये असा- मालेगाव- १५, दाभाडी-१२, कळवाडी-२२, निमगाव-२, सौंदाणे-७, सायने बु।।-२, कौळाणे निं-१५, वडनेर-४, करंजगव्हाण-१०, झोडगे-३२ झाला आहे.