खोपडी व देवपूर परिसरात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 17:40 IST2019-06-27T17:40:04+5:302019-06-27T17:40:18+5:30

सिन्नर : तालुक्यातील खोपडी व देवपूर परिसरात बुधवारी (दि.२७) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाचे हजेरी लावली. दिवसभर भयंकर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते

Heavy rain in Khopdi and Devpur area | खोपडी व देवपूर परिसरात पावसाची दमदार हजेरी

खोपडी व देवपूर परिसरात पावसाची दमदार हजेरी

सिन्नर : तालुक्यातील खोपडी व देवपूर परिसरात बुधवारी (दि.२७) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाचे हजेरी लावली.
दिवसभर भयंकर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते अशातच अचानक पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. सुमारे अर्धा तास पावसाने या भागात हजेरी लावल्याने शेतात पाणी साचलेले दिसत होते. खोपडी, देवपूर रस्त्यावर जात असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने कामगारांसह नागरिकांची धावपळ उडाली. रोहिणी नक्षत्रात पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह हजेरी लावली होती. वादळाच्या तडाख्यात तालुक्यात काही नुकसान झाले होते. गेले आठ ते दहा दिवस तालुक्यात मृगाचा एकही थेंब न पडल्याने खरीपाची सुरूवात कशी करावी, याची मोठी चिंता शेतकऱ्यांना लागली होती.

Web Title: Heavy rain in Khopdi and Devpur area

टॅग्स :Rainपाऊस