धारणगावला प्रचंड पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 14:09 IST2019-06-27T14:08:50+5:302019-06-27T14:09:53+5:30
लासलगाव: विंचुर येथुन दक्षिणेला सुमारे बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या धारणगाव वीर व धारणगाव खडक परिसरात सायंकाळी प्रचंड वेगवान ढगफुटी सदृश पावसाने जोरदार बरसात करून अवघ्या काही मिनीटात हा परिसर जलमय करून टाकला.

साचलेले पाणी अखेर खडकओहोळ नाल्यातुन पुढे गोदावरीत वाहून गेले.
ठळक मुद्देशेतात पुर्णपणे साचलेले पाणी अखेर खडकओहोळ नाल्यातुन प्रचंड दुधडी भरत वाहिले
लासलगाव: विंचुर येथुन दक्षिणेला सुमारे बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या धारणगाव वीर व धारणगाव खडक परिसरात सायंकाळी प्रचंड वेगवान ढगफुटी सदृश पावसाने जोरदार बरसात करून अवघ्या काही मिनीटात हा परिसर जलमय करून टाकला.
या दोन्ही गावातील शेतात पुर्णपणे साचलेले पाणी अखेर खडकओहोळ नाल्यातुन प्रचंड दुधडी भरत वाहिले व पुढे गोदावरीत वाहून गेले. या प्रचंड पावसाने पिकांचे नुकसान झाले .