भाऊसाहेबनगर येथे जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:42 IST2020-09-25T22:40:59+5:302020-09-26T00:42:04+5:30
भाऊसाहेबनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस गुरुवारपासुन विश्रांती घेईल ही अपेक्षा काल फोल ठरली असुन शेतकरी वर्ग कालच्या पावसाने अधिक चिंताग्रस्त झाला आहे.

भाऊसाहेबनगर येथे जोरदार पाऊस
भाऊसाहेबनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पाऊस गुरुवारपासुन विश्रांती घेईल ही अपेक्षा काल फोल ठरली असुन शेतकरी वर्ग कालच्या पावसाने अधिक चिंताग्रस्त झाला आहे. खरिपातील सोयाबीन,मका,भुईमुग ही पीक काढणीयोग्य होत आली आहे.मात्र उत्तरा नक्षत्रातही रोज पाऊस हजेरी लावत आहे. पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज सर्वत्र वर्तविला जात आहे. दोन दिवस तसे वातावरण परिसरात वाटु लागले होते .२३ला पावसाच्या सरी अंतराअंतराने आल्यामुळे हायसे वाटु लागले होते.मात्र पाच वाजेनंतर भाऊसाहेबनगर, वडाळीनजिक, पिंपरी, पिंपळस परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला आणि शेतकरीवर्गाची चिंता वाढली आहे. काढणीला आलेली पीके जी वाचली आहे. ती काढता येतील,टोमॅटो पीकेल लाभ होईल. द्राक्षाची एक्टोबर छाटणीचे नियोजन करण्यात येईल या मनसुब्यावर कालच्या पासाने अक्षरश: पाणी फिरविले आहे.कधी पाऊस उघडेल या चिंतेत रोज भरच पडत असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.