ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी परिसरात गारांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:19 IST2018-05-14T00:19:21+5:302018-05-14T00:19:21+5:30
तपमानाचा पारा वाढत असून जिवाची काहिली होत असताना येवला शहरात रविवारी दुपारी चार वाजता १५ मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे अल्प प्रमाणात का होईना उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे.

ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी परिसरात गारांचा पाऊस
येवला : तपमानाचा पारा वाढत असून जिवाची काहिली होत असताना येवला शहरात रविवारी दुपारी चार वाजता १५ मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे अल्प प्रमाणात का होईना उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. रविवारी पडलेल्या पावसाने नागरिकांना अल्पसा दिलासा दिला. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास येवला शहर व तालुक्यात पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. यावेळी वाराही सुटला होता. विजांचा कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. लहानग्यांनी तसेच तरुणांनी या अचानक आलेल्या पावसामध्ये भिजण्याचा आनंद लुटला. ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी या परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता वादळी वारे सुरू होऊन पावसाचे आगमन झाले. पावसाबरोबरच बोराच्या आकाराच्या गारा पडण्यास सुरु वात झाली.