शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

झगडपाडा परिसरात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:07 IST

तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झगडपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने येथील शिवनदीला पूर येऊन फरशी पुलावरून पाणी वाहू लागले. अशावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन पुरातून मार्गस्थ व्हावे लागले.

सुरगाणा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झगडपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने येथील शिवनदीला पूर येऊन फरशी पुलावरून पाणी वाहू लागले. अशावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन पुरातून मार्गस्थ व्हावे लागले.आंबूपाडा येथे शासकीय आश्रमशाळा व आयटीआय आहे. तसेच मुख्य बाजारपेठ म्हणून बाºहे येथे या भागातील नागरिक ये-जा करीत असतात. याठिकाणी शासकीय आश्रमशाळा ते झगडपाडा दरम्यान एक अरूंद आणि कमी उंचीचा पूल आहे.पावसाळ्यात जरी कमी पाऊस पडला तरी येथे पूर येत असतो आणि त्या पुलावरून वेगाने पाणी वाहत असते. त्यामुळे या परिसरातील झगडपाडा, खोकरविहीर, चिंचपाडा, भेनशेत, कहांडोळपाडा या गावातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना तसेच जि.प. शाळेतील शिक्षकांना या पुलावरून येता जाताना जीव धोक्यात घालून मोठी कसरत करावी लागते आहे. तर जास्त पाऊस पडला तर पूरस्थितीमुळे जि.प. शाळेच्या शिक्षकांना शाळेवर पोहोचता येत नाही, विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत व आयटीआयला जाता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानदेखील होत आले आहे. तसेच चिंचपाडा (खोकरविहीर) येथील नवीन बांधलेले रु ग्णालय डॉक्टर व कर्मचारीविना धूळ खात असल्याने याच पुलावरून मोठी कसरत करीत जीव धोक्यात घालून बाºहे येथील रु ग्णालयात रु ग्णांना न्यावे लागत आहे.येथे जास्त उंचीचा पूल बनविण्यात यावा व येथील रु ग्णालयात डॉक्टर व कर्मचारी यांची नियुक्ती करून रु ग्णालय लवकर सुरू करावे अशी मागणी येथील मनोहर जाधव, सुनील महाले, हिरामण महाले, हंसराज घांगळे, हिरामण चौधरी, जयराम घांगळे, मनोहर महाले, देवीदास घांगळे आदी ग्रामस्थांसह विद्यार्थी पुष्पराज घांगळे, मनीषा महाले, दीक्षा जाधव आदी विद्यार्थ्यांनी केली आहे.पावसाचे प्रमाण जास्त राहिल्यास अशा लहान-मोठ्या पुलावरून अर्ध्या तासाच्या आत पूर येत असतो. त्यामुळे तालुक्यातील अशा छोट्या पुलावरूनदेखील यावर्षी दोन शिक्षकांना तसेच काही ग्रामस्थांना पुरातून मार्ग काढताना वाहून गेल्याने जीव गमवावा लागला आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीriverनदी