नाशिक शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली. एका २१ वर्षीय दिव्यांग तरुणीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. दीक्षा त्रिभुवन असे मृत तरुणीचे नाव असून, आत्महत्येपूर्वी तिने आपल्या हाताच्या तळव्यावर पालकांसाठी लिहिलेला शेवटचा संदेश पाहून पोलीसही हेलावून गेले आहेत.
दीक्षा ही जन्मतःच दिव्यांग होती आणि शहरातील एका दिव्यांग शाळेत ती शिक्षण घेत होती. रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातील पंख्याला दीक्षा लटकलेल्या अवस्थेत तिच्या कुटुंबियांना दिसून आली. त्यानंतर तिला तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान दीक्षाच्या हातावर काहीतरी लिहिलेले असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. तिने आपल्या तळहातावर "सॉरी, आय लव्ह यू, मॉम- डॅड", असे लिहिले. आपल्या लाडक्या लेकीचा हा शेवटचा मेसेज पाहून पालकांनी रुग्णालयातच हंबरडा फोडला.
दीक्षा स्वभावाने अत्यंत शांत आणि मिळूनमिसळून वागणारी होती. ती आपल्या दिव्यांगत्वावर मात करून जिद्दीने शिक्षण घेत होती. आपल्या मुलीचे भविष्य उज्ज्वल असेल, अशी आशा तिच्या कुटुंबाला होती. मात्र, तिच्या मनात नेमके काय सुरू होते आणि तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचे गूढ कायम आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. घरात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे दीक्षाच्या मित्रमैत्रिणींकडे आणि शाळेतही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
Web Summary : A 21-year-old disabled woman in Nashik tragically ended her life. Before dying, she wrote "Sorry, I love you, Mom-Dad" on her hand. Police are investigating the cause of this heartbreaking suicide, as no note was found.
Web Summary : नासिक में एक 21 वर्षीय दिव्यांग युवती ने आत्महत्या कर ली। मरने से पहले, उसने अपने हाथ पर "सॉरी, आई लव यू, मॉम-डैड" लिखा। पुलिस इस हृदयविदारक आत्महत्या के कारण की जांच कर रही है, क्योंकि कोई सुसाइड नोट नहीं मिला है।