प्रदक्षिणा मार्गावर फिरते आरोग्य पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:04 AM2018-08-26T01:04:21+5:302018-08-26T01:05:22+5:30

तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त शहरात रविवारी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

The Health Team revolves around the Pradakshina Road | प्रदक्षिणा मार्गावर फिरते आरोग्य पथक

प्रदक्षिणा मार्गावर फिरते आरोग्य पथक

Next

त्र्यंबकेश्वर : तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त शहरात रविवारी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.  बहुतेकांनी शनिपौर्णिमा साजरी केल्याने शनिवारी गर्दीचे प्रमाण काहीअंशी कमी होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे व उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांनी त्र्यंबकराज देवस्थानच्या दर्शन बारीच्या नियोजनाची पाहणी केली. सर्व शासकीय यंत्रणांनी आपापली सज्जता केली आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी फिरते पथक तैनात करण्यात आले आहे. तालुका आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे विशेष काळजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.योगेश मोरे यांनी दिली.  त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील चौक, कुशावर्त तीर्थ चौक, सापगाव फाटा, खंबाळे पार्किंग, पहिने, धाडोशी फाटा, गौतम ऋ षी असे सहा पथके तैनात केली आहेत. त्यांच्या मदतीला दोन रुग्णवाहिका असणार आहे. सर्व आरोग्य पथकांकडे आवश्यक औषध साठा व वैद्यकीय अधिकाºयांसह चार कर्मचाºयांचा स्टाफ असेल. याशिवाय सर्व सोयींनी युक्त तज्ज्ञ डॉक्टरांसह त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रु ग्णालय सज्ज आहे, असे उपजिल्हा रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे यांनी सांगितले.  पालिका ठेकेदारी सफाई कर्मचाºयांनी तीन महिन्यांचा पगार दिला नाही म्हणून शनिवारी काम बंद ठेवले होते. नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर, मुख्य अधिकारी डॉ. चेतना मानुरे-केरु रे यांनी त्वरेने कायमस्वरुपी सफाई कामगारांना आदेश दिल्याने गैरसोय झाली नाही.

Web Title: The Health Team revolves around the Pradakshina Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.