कोरोना मुक्तीसाठी पेठ शहरात आरोग्य सर्वेक्षण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 15:50 IST2020-07-26T15:49:56+5:302020-07-26T15:50:35+5:30
पेठ : शहरातील कोरोनाची साखळी खंडीत झाली असली तरी संभाव्य उपाययोजना व खबरदारी म्हणून शहरात आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत असून आरोग्य कर्मचाºयांना साहित्य वाटप करण्यात आले.

वैद्यकिय किटचे वाटप करतांना मनोज घोंगे, शामराव गावीत, कुमार मोंढे, लक्ष्मीकांत कहार आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : शहरातील कोरोनाची साखळी खंडीत झाली असली तरी संभाव्य उपाययोजना व खबरदारी म्हणून शहरात आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत असून आरोग्य कर्मचाºयांना साहित्य वाटप करण्यात आले.
पेठ शहर ही तालुक्याची प्रमूख बाजारपेठ असल्याने तालुका व बाहेरील नागरिकांची मोठया प्रमाणावर वर्दळ असते. कोरोनाची संपर्क साखळी खंडीत झाली असली तरी शहरात सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे.
याप्रसंगी नगरसेवक मनोज घोंगे, बाजार समिती संचालक शाम गावीत, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, तुळशिराम वाघमारे, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, आरोग्य सभापती लिला निकम, सभापती विलास अलबाड, गटनेते भागवत पाटील, नगरसेवक गौरव गावीत, आरोग्य विभागाचे वरिष्ठ लिपीक बाळसाहेब चौधरी, बाळकृष्ण सोनार तसेच परिचारीका, आशासेविका, नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.