फेसाळयुक्त पाण्यामुळे २५ गावांत आरोग्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:38+5:302021-06-09T04:17:38+5:30

नाशिक मनपा हद्दीतील मल:निस्सारण केंद्रातून विना प्रक्रीया मलजलाचे पाणी रात्रीच्यावेळी नदीपात्रात सोडले जाते हेच दूषित पाणी रात्रीच्या ...

Health problem in 25 villages due to foamy water | फेसाळयुक्त पाण्यामुळे २५ गावांत आरोग्याचा प्रश्न

फेसाळयुक्त पाण्यामुळे २५ गावांत आरोग्याचा प्रश्न

नाशिक मनपा हद्दीतील मल:निस्सारण केंद्रातून विना प्रक्रीया मलजलाचे पाणी रात्रीच्यावेळी नदीपात्रात सोडले जाते हेच दूषित पाणी रात्रीच्या वेळी एकलहरे बंधाऱ्यात साचून पुढे फेसाळयुक्त स्वरूपात ओढा गावाजवळून प्रवाहित होते तेथे पुलाचे काम सून असून तेथे पाणी साचून मोठा ढीग तयार होतो. रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेस जमा होतो एकलहरे, कोटमगाव, हिंगणवेढा, सामनगाव, जाखोरी, चांदगिरी व पलीकडील शिलापूर, ओढा, लाखलगाव येथील शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते व नागरिकांना या फेसाळयुक्त पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावे लागते गेल्या अनेक दिवसांपासून या समस्येकडे कोणाचेही लक्ष नाही, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

कोट-

गोदावरी नदीतील प्रदूषण व पानवेली कायमस्वरूपी हटविण्यासाठी महापालिकेने त्यांच्या अर्थसंकल्पात ठोस आर्थिक तरतूद करावी तसेच विना प्रक्रिया सांडपाणी सोडण्यावर प्रामुख्याने बंदी आणावी. अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दाद मागावी लागेल.

सागर जाधव - सामाजिक कार्यकर्ते, एकलहरे.

कोट

नाशिक मनपा हद्दीतील मल:निस्सारण प्रकल्पातून फेसाळ व दुर्गंधीयुक्त पाणी गोदावरी नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांना विविध साथींच्या आजारांचा सामना करावा लागतो. खराब पाण्यामुळे शेतीही निकस होऊ लागली आहे. मनपाने त्वरित दखल घेऊन यावर उपाययोजना करावी,अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल.

- विनायक हारक- रहिवाशी,एकलहरे.

कोट-

एकलहरे बंधाऱ्यातील पानवेलींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचा त्रास वाढल्याने जनावरेही आजारी पडू लागली आहेत. पानवेली वाहून जाण्यासाठी पाटबंधारे खात्याने पाणी सोडावे. गेल्या सहा महिन्यांपासून ही परिस्थिती आहे. ग्रामपंचायत, वीज केंद्र प्रशासन, महापालिका कोणीही याकडे लक्ष देत नाही. - गोरख दुशिंग- रहिवाशी, एकलहरे.

Web Title: Health problem in 25 villages due to foamy water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.