शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मिशनचे कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 16:10 IST

राष्ट्रीय  आरोग्य अभियानासाठी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्यसेवेत कायमस्वरूपी सामील करून घेण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार कर्मचारी सहभागी झाल्याने कोरोनाचा मुकाबला करण्याच्या कामात नव्याने संकट निर्माण झाले आहे. 

ठळक मुद्देकोरोनाविरोधी लढ्यात नव्याने संकट राष्ट्रीय आरोग्य मिशनचे कंत्राटी कर्मचारी संपावर कायमस्वरूपी सेवेत सामील करून घेण्याची मागणी

नाशिक : कोरोनाचे संकट अधिकाधिक गडद होत  चाललेले असताना राष्ट्रीय  आरोग्य अभियानासाठी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्यसेवेत कायमस्वरूपी सामील करून घेण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, या आंदोलनातनाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार कर्मचारी सहभागी झाल्याने कोरोनाचा मुकाबला करण्याच्या कामात नव्याने संकट निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविले जात असून, यासाठी दरवर्षी या अभियानासाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम समन्वयक अशा विविध संवर्गासाठी हजारो पदे भरली जातात. दरवर्षी त्यांची सेवा खंडित करून पुन्हा नव्याने जाहिरात काढून भरती केली जाते. कोरोनाच्या संकट काळात राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने सेवा बजावली असून, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी आरोग्यसेवेत कायम करावे, अशी मागणी करून आंदोलन सुरू केले आहे. प्रारंभी काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधले, त्यानंतर एक दिवस कामबंद आंदोलन करून शासनाला निवेदनही सादर केले. मात्र तरीही दखल घेतली गेली नाही. उलट कोरोनाच्या काळात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी राज्यात १७ हजार आरोग्याची रिक्त पदे भरण्याची तयारी चालविली  आहे. असे असताना नवीन भरती करण्याऐवजी आरोग्य मिशनच्या कर्मचाऱ्यांनाच सेवेत कायम करावे या मागणीसाठी गुरुवार (दि. ११) पासून या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडले आहे.  राज्यात आरोग्य मिशनचे सुमारे १८ हजार कर्मचारी असून, नाशिक जिल्ह्यात अडीच हजार कर्मचारी आहेत. गुरुवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या कार्यालयात सर्व कर्मचाºयांनी एकत्र येत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य विभागाच्या कामकाज ठप्प झाले असून, ऐन कोरोनाच्या संकटाच्या काळात नवीन संकट उभे ठाकले आहे. या आंदोलनात संगीता सरदार, कुंदा सहारे, किरण शिंदे, दिलीप उटाणे, बाजीराव कांबळे, अरुण खरमाटे यांच्यासह असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकHealthआरोग्यagitationआंदोलन