चेंबर फुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:40+5:302021-06-26T04:11:40+5:30
----------------------------------------------------- चंद्रेश्वरगड येथे समाधी मंदिराचे भूमिपूजन चांदवड : येथील पुरातन गड चंद्रेश्वर येथे समाधी मंदिर, ...

चेंबर फुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
-----------------------------------------------------
चंद्रेश्वरगड येथे समाधी मंदिराचे भूमिपूजन
चांदवड : येथील पुरातन गड चंद्रेश्वर येथे समाधी मंदिर, चंद्रेश्वरी माता मंदिर , जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा झाला. महंत बन्सीपुरी महाराज यांच्या प्रेरणेने व व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी दयानंद महाराज ( प्रथम चंद्रेश्वरबाबा ), महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदपुरी महाराज
(द्वितीय चंद्रेश्वरबाबा ) चंद्रेश्वरी माता मंदिर भूमिपूजन सोहळा झाला. यावेळी श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराने परिश्रम घेतले. सदर कार्य हे लोकसहभागातून होत आहे, त्यामुळे मंदिर जीर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन यावेळी करण्यात आले.
-------
चांदवडला दिवसभरात दोन नवीन रुग्ण
चांदवड : येथे २४ जून रोजी घेतलेल्या ३४ पैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. रुग्णामध्ये हिवरखेडे पुरुष, वडाळीभोई महिला आदि एकूण दोन जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.